अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 07:11 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. पारनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
पारनेर तालुक्यात आता 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-
1) ढवळपुरी गट (ढवळपुरी गण)- खडकवाडी, पळशी, वनकुटे (तास), ढवळपुरी (भनगडेवाडी). (भाळवणी गण)- भाळवणी, काळकुप, माळकुप, पाडळी कान्हुर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, सारोळा आडवाई, दैठणेगुंजाळ, लोणी हवेली.
2) टाकळी ढोकेश्वर गट (टाकळी ढोकेश्वर गण)- टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ (गाजदीपूर), कर्जुले हर्या, ढोकी, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, धोत्रे बु. (धोत्रे खुर्द), कासारे, कारेगाव. (वासुंदे गण)- वासुंदे, देसवडे, मांडवे खु., पोखरी, काताळवेढा (डोंगरवाडी), पळसपूर, म्हसोबाझाप, वारणवाडी.
3) कान्हुर पठार गट (कान्हुर पठार गण)- कान्हुरपठार, विरोली, हत्तलखिंडी, पिंपळगाव तुर्क, पुणेवाडी, येसदरे, करंदी, किन्ही (बहिरोबावाडी), गोरेगाव, डिक्सळ, हिवरे कोरडा. (वडझिरे गण)- वडझिरे (शेरीकोलदरा), बाभुळवाडे, पाडळी दर्या, जाधववाडी, पिंपळगाव रोठा, वडगाव दर्या, अक्कलवाडी, पिंप्री पठार, गारगुंडी, रांधे, नांदुरपठार, सावरगाव, लोणीमावळा.
4) निघोज गट (निघोज गण)- निघोज (मोरवाडी, ढवणवाडी, वडगावगुंड, शिरसुले), वडनेर बु., देवीभोयरे, पठारवाडी. (अयकुटी गण)- अळकुटी, चोंभूत, रेनवडी, शिरापूर, शरीफकासारे, कळस, पाडळी आळे, पाबळ, म्हस्केवाडी, गारखिंडी, दरोडी.
5) जवळा गट (जवळा गण)- जवळा, सांगवीसुर्या, सिद्धेश्वरवाडी, गांजीभोयरे, चिंचोली, पिंप्रीजलसेन, गुणोरे (गाडीलगाव), राळेगण थेरपाळ (हकीगतपूर, आजमपूर). (वाडेगव्हाण गण)- राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, कुरुंद, यादववाडी, नारायणगव्हाण, मावळेवाडी, वडुले, कोहोकडी, पिंपळनेर, म्हसे खुर्द.
6) सुपा गट (सुपा गण)- सुपा, हंगा, शहांजापूर, मुंगशी, वाळवणे, रायतळे, पिंप्रीगवळी, अस्तगाव, रुईछत्रपती. (रांजणगाव मशिद गण)- रांजणगाव मशिद, आपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, पाडळी रांजणगाव (कळमकरवाडी), पळवे बु., कडूस, पळवे खुर्द, म्हसणे (सुलतानपूर), वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव, वाघुंडे बु., वाघुंडे खुर्द, जातेगाव, पानोली.
Comments