अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 07:17 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात आता 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-
1) पिंपळगाव पिसा गट (पिंपळगाव पिसा गण)- पिंपळगाव पिसा, विसापूर, कोंडेगव्हाण, निंबवी, कोरेगव्हाण, चांभुर्डी, अरणगाव दुमाला, सारोळा सोमवंशी. (देवदैठण गण)- देवदैठण, राजापूर (दाणेवाडी, मेंगालवाडी), ढवळगाव, हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, येवती.
2) कोळगाव गट (कोळगाव गण)- कोळगाव (पांढरेवाडी, लगडवाडी, वेठेकरवाडी, भापकरवाडी), चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, उखलगाव, मुंगुसगाव. (घारगाव गण)- घारगाव, कोथूळ, पारगाव सुद्रिक (खेतमाळीसवाडी), घोटवी, वडाळी, सुरोडी, बेलवंडी कोठार.
3) मांडवगण गट (मांडवगण गण)- मांडवगण, महांडुळवाडी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी, घोगरगाव, कामटी (वडघुल), बनपिंप्री. (भानगाव गण)- भानगाव, रुईखेल, बांगार्डे, ढोरजे, पिसोरेखांड, खांडगाव, टाकळीलोणार, कोसेगव्हाण (महादेववाडी).
4) आढळगाव गट (आढळगाव गण)- आढळगाव (गव्हाणेवाडी, डोकेवाडी), तांदळी दुमाला, देऊळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, घुगलवडगाव. (पेडगाव गण)- पेडगाव, चांडगाव, हिरडगाव, टाकळी कडेवळीत, शेडगाव, चोराचीवाडी, (भिंगाणदुमाला, भिंगाणखालसा), अधोरेवाडी.
5) बेलवंडी बु. गट- (येळपणे गण)- येळपणे (पोलिसवाडी, पिसोरे बु.), म्हसे (वडगावशिंदोडी), माठ, उक्कडगाव, एंरडोली, पिंप्री कोलदंर, रायगव्हाण. (बेलवंडी बुद्रुक गण)- बेलवंडी बु., लोणीव्यंकनाथ (महादेववाडी, पार्वतवाडी), बाबुर्डी.
6) लिंपणगाव गट (हंगेवाडी गण)- हंगेवाडी, बोरी, वांगदरी, (मासाळवाडी, चोरमलेवाडी, डोमाळेवाडी, ढोकराईमाळ), शिरसगाव बोडखा, चिंभळे. (लिंपणगाव गण)- लिंपणगाव (जंगलेवाडी, मुंढेकरवाडी, जोशीवस्ती), म्हातारपिंप्री, मढेवडगाव.
7) काष्टी गट (काष्टी गण)- काष्टी, सांगवी दुमाला, निमगाव खलू. (अजनूज गण)- अजनूज, आर्वी (अनगरे), वेळू, चिखलठाणवाडी (कणसेवाडी), आनंदवाडी, कौठा (शिपलकरवाडी), गार.
Comments