कर्जत । वीरभूमी- 02-Jun, 2022, 08:46 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. कर्जत तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप गट व गण रचना प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-
1) मिरजगाव गट (निमगाव गांगर्डा गण)- मांदळी, कोंभळी, चिंचोली रमजान, निमगाव गांगर्डा, थेरगाव, नागमठाण, कोकणगाव, रवळगाव, खांडवी, घुमरी, बेलगाव. (मिरजगाव गण)- मिरजगाव (गोंदर्डी), बाभुळगाव खालसा, माही, जळगाव, नागापूर, नागलवाडी, रायंजन, तिखी.
2) चापडगाव गट (चापडगाव गण)- चापडगाव, जळकेवाडी, पाटेवाडी (हंडाळवाडी), पाटेगाव, निंबोडी, सितपूर, तरडगाव, दिघी, निमगाव डाकू, मलठण (आनंदवाडी), नवसरवाडी. (टाकळी खंडेश्वरी गण)- टाकळी खंडेश्वरी, खंडाळा (गोयेकरवाडी), बहिरोबावाडी (पठारवाडी), रेहकुरी, वालवड, चांदे खुर्द (खुरंगेवाडी), चांदे बु. मुळेवाडी, गुरवपिंप्री (थेटेवाडी), डिकसळ, चिंचोली काळदात, सुपे.
3) कोरेगाव गट (कोरेगाव गण)- कोरेगाव, कापरेवाडे, कुंभेफळ (धांडेवाडी, नेटकेवाडी), बजरंगवाडी, दुरगाव, थेरवडी, बेनवडी (कोळवडी), लोणीमसदपूर. (आळसुंदे गण)- आळसुंदे, देशमुखवाडी, तोरकडवाडी, सोनाळवाडी, कानगुडवाडी, चिलवडी (होलेवाडी), माळंगी (डोंबाळवाडी, शेगुड), खातगाव, आंबिजळगाव, निंबे.
4) कुळधरण गट (कुळधरण गण)- कुळधरण (सुपेकरवाडी), कोपर्डी, रुईगव्हाण, भोसे (चलाखेवाडी), कौडाणे, बिटकेवाडी (माळेवाडी), शिंदे, नांदगाव, वडगावतनपुरा. (बारडगाव सुद्रीक गण)- बारडगाव सुद्रीक, तळवडी (ताजू), बारडगावदगडी (बेलवंडी, येसवडी), राक्षसवाडी खुर्द, धालवडी, पिंपळवाडी, करमणवाडी, आखोणी, वायसेवाडी.
5) राशिन गट (राशिन गण)- राशिन, काळेवाडी (रौकाळेवाडी), परिटवाडी, करपडी, शिंपोरा (मानेवाडी, बाभुळगाव दुमाला). (भांबोरा गण)- भांबोरा (हिंगणगाव), जलालपूर, सिद्धटेक (देऊळवाडी, बेर्डी), दुधोडी, गणेवाडी, खेड, औटेवाडी.
ptQcsEkiAqGyOlxW