शेवगाव । वीरभूमी - 05-Jun, 2022, 09:53 AM
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यासाठी 23 कोटी 19 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील कामासाठी 12 कोटी 91 लक्ष रुपये तर पाथर्डी तालुक्यातील कामांसाठी 10 कोटी 28 लक्ष रुपयांचे कामांचा समावेश असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
मागील पाच वर्षांचे कालावधीत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली होती, ज्या गावामध्ये जलसंधारणाची कामे झाली या परिसराची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या गावाची पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाणी अडवणे अत्यावश्यक असून सन 2022-23 अंतर्गत मंजूर बंधार्यांची कामे झाल्यानंतर त्या परिसरातील पाणीपातळी वाढून शेतकर्यांचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत मंजूर कामांमध्ये शेवगाव तालुक्यातील 14 कामांचा समावेश आहे. यामध्ये मुंगी दोन बंधारे (रक्कम 167 लक्ष व 129 लक्ष रुपये), कांबी दोन बंधारे (रक्कम 62 लक्ष व 54 लक्ष रुपये), राणेगाव एक बंधारा (रक्कम 58 लक्ष रुपये), ठाकुर पिंपळगाव एक बंधारा (रक्कम 58 लक्ष रुपये), खामपिंप्री एक बंधारा (रक्कम 122 लक्ष रुपये), मडके एक बंधारा (रक्कम 81 लक्ष रुपये), गायकवाड जळगाव दोन बंधारे (रक्कम 133 लक्ष व 68 लक्ष रुपये), दहिगाव-शे एक बंधारा (रक्कम 71 लक्ष रुपये), सुकळी एक बंधारा (रक्कम 44 लक्ष रुपये), अंतरवाली (रक्कम 56 लक्ष व 59 लक्ष रुपये), या कामांचा समावेश आहे.
पाथर्डी तालुक्यातील मंजूर 12 कामापैकी मालेवाडी तीन बंधारे (रक्कम 34 लक्ष, 49 लक्ष, 45 लाख रुपये), चिंचपूर पांगुळ दोन बंधारे (रक्कम 79 लक्ष व 70 लक्ष रुपये), चिंचपूर इजदे (रक्कम 68 लक्ष रुपये), मिडसांगवी दोन बंधारे (रक्कम 177 लक्ष व 174 लक्ष रुपये), पिंपळगाव टप्पा एक बंधारा (रक्कम 41 लक्ष रुपये), भालगाव एक बंधारा (रक्कम 176 लक्ष रुपये), बोरसेवाडी एक बंधारा (रक्कम 60 लक्ष रुपये), लांडकवाडी एक बंधारा (रक्कम 54 लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याच्या कामाच्या मंजुरीसाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील मंजूर बंधार्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर या गावातील पाणीपातळी वाढणार असल्याने लाभार्थी गावांतील नागरिकांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचे आभार मानले आहेत.
QadPWOeiVRvrT