चार जागा बिनविरोध । 19 जून रोजी मतदान
पाथर्डी । वीरभूमी- 09-Jun, 2022, 07:29 AM
राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कासार पिंपळगाव सेवा सोसायटीच्या 4 जागा बिनविरोध झाल्या असून 9 जागेसाठी 12 उमेदवार राहील्याने निवडणूक होत आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. पारधे यांनी दिली.
कासार पिंपळगाव सेवा सोसायटीच्या 13 जागेसाठी 31 जणांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर तब्बल 19 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे सोसायटीच्या 4 जागा बिनविरोध झाल्या तर 9 जागेसाठी निवडणूक होत आहे. या 9 जागेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बिनविरोध निवडणूक आलेले उमेदवार पुढील प्रमाणे- महिला राखीव मतदार संघ- पद्माबाई भिवसेन देशमुख, मनिषा मुकुंद राजळे. इतर मागास प्रवर्ग- सदाशिव केरूबापू तुपे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून आप्पासाहेब नाथा शिरसाट हे चार संचालक बिनविरोध निवडून आले.
तर सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील 8 जागेसाठी 10 उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातील 1 जागेसाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे अशा 9 जागेसाठी दि. 19 रोजी मतदान होत आहे.
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील 8 जागेसाठी सुनिल हौसराव राजळे, विनायक माणिक भगत, दिलीप रखमाजी राजळे, द्वारकानाथ विठ्ठल म्हस्के, वसंतराव परसराम भगत, विक्रम बलभिम राजळे, बाळासाहेब रामभाऊ कवळे, संभाजी गोविंद राजळे, दत्तात्रय बाबुराव शेळके, संभाजी ठकाजी राजळे असे 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातील 1 जागेसाठी कांतीश चंद्रभान तिजोरे आणि सुरेश विश्वनाथ तिजोरे असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बुधवारी चिन्ह वाटप झाले असून या 9 जागेसाठी दि. 19 जून रोजी मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन डी. डी. पारधे हे काम पाहत आहेत.
yJCqhuBIKlFH