प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
तालुकानिहाय हे आहेत इच्छुक उमेदवार । नेत्यांची वाढवणार डोकेदुखी
अहमदनगर । वीरभूमी - 17-Jun, 2022, 11:19 AM
शिक्षकांची कामधेनू असणार्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आज शुक्रवार दि. 17 पासून सुरुवात होत आहे. तालुकानिहाय प्रत्येक मंडळाकडून इच्छुक असलेल्यांची भाऊगर्दी बघता सर्वच नेत्यांची चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.अर्ज भरण्याची मुदत 17 ते 23 जून असून 24 जूनला अर्ज छाननी होऊन अर्ज माघारीची मुदत 27 जून ते 11 जुलै अशी आहे. चिन्ह वाटप 12 जुलैला होऊन त्यानंतर प्रचारासाठी दहा ते बारा दिवस असतील. मतदान 24 जुलै व मतमोजणी लगेच 25 जुलैला होईल.
नगर तालुक्यातून गुरुमाऊलीच्या तांबे गटाकडून महेश भनभने, बाळासाहेब कापसे, विजय ठाणगे, बापू बोर्हाडे, तर रोहोकले गटाकडून शरद कोतकर, संजय दळवी, भाऊसाहेब फंड, भगवान बोरुडे, संजय शिंदे, गुरुकुल मंडळाकडून जालिंदर खाकाळ, मधुकर मैड, दत्ता जाधव, स्वाती गोरे, सदिच्छा मंडळाकडून रेहमान शेख आदी इच्छुक आहेत.
पारनेर तालुक्यात गुरुमाऊली तांबे गटाकडून सूर्यकांत काळे, आबा दळवी, सुरेश निवडुंगे, प्रल्हाद भालेकर, कारभारी बाबर, मंगेश खिलारी, चंद्रकांत गट, रोहोकले गटाकडून प्रवीण ठुबे, संतोष खामकर, सुनील दुधाडे, बाबा धरम, बाळासाहेब रोहोकले, स्वाती झावरे, गुरुकुल मंडळाकडून संभाजी औटी, अशोक आगळे, दादा नवले, हिंमत चेमटे, संजय रेपाळे, रभाजी भांड, हिम्मत चेमटे, युवराज किलाळ, सदिच्छा कडून चंद्रकांत मोढवे, प्रकाश केदारी, बाळासाहेब खिलारी, समता कडून सर्जेराव जाधव, स्वराज्य कडून सचिन नाबगे, प्रविण झावरे आदी इच्छुक आहेत.
संगमनेर तालुक्यातुन तांबे गटाकडून भाऊराव राहिंज, रामनाथ कार्ले, कैलास राहाणे, शंकर भोसले, सोमनाथ गळंगे, दिनकर सागर, केशव घुगे, अंजली मुळे, रोहोकले गटाकडून आर पी राहणे, अशोक शेटे, अनिता नेहे, संतोष भोर, विलास शिरोळे, सोमनाथ घुले, गुरूकुल मंडळाकडून वृषाली कडलग, बंडू हासे, बाळासाहेब जाधव, भागवत कर्पे, दत्तात्रय कर्पे, सदिच्छा कडून चंदू कर्पे, शिवाजी आव्हाड, इबटा कडून राजेंद्र कडलग, स्वराज कडून योगेश थोरात आदी इच्छुक आहेत.
अकोले तालुक्यात तांबे गटाकडून राम वाकचौरे, बाळासाहेब आरोटे, अण्णा आभाळे, कैलास आरोटे, रोहोकले गटाकडून सुरेश वाकचौरे, बाळासाहेब भांबळे, सुदाम धिंदळे, गुरुकुल कडून बाळासाहेब भांगरे, रघुनाथ कचरे, इंदू नवले, इबटा कडून सुभाष बनगर, प्रशांत गवारी, स्वराज्य कडून प्रतिक नेटके हे इच्छुक आहेत.
कोपरगाव तालुक्यातुन तांबे गटाकडून शशी जेजुरकर, विलास गवळी, किरण निंबाळकर, सुनील ढेपले, माणिक कदम, बापूसाहेब हजारे, रोहोकले गटाकडून सुभाष गरुड, दीपक झावरे, शिवाजी आभाळे, गुरुकुल कडून अशोक कानडे, दत्ता गरुड, आप्पासाहेब चौधरी, सिताराम गव्हाणे, प्रमोद जगताप, ज्ञानेश्वर सैदाणे, सदिच्छा कडून विनोद सोनवणे, इबटा कडून प्रमोद रणधीर आदी इच्छुक आहेत.
राहाता तालुक्यात तांबे गटाकडून सुनिल गजानन गायकवाड, साहेबराव डबळे, बाळासाहेब दिघे, सुवर्णा लहारे, योगेश वाघमोरे, प्रविण पटेकर, रोहोकले गटाकडून विनोद तोरणे, सुधाकर अंत्रे, रामकीसन असावा, गुरुकुल कडून संजय नळे, संजय आग्रे, सुनिल रामचंद्र गायकवाड, शैला जाधव, इबटा मंडळाकडून अरूण मोकळे, सुहास पवार, स्वराज्य मंडळाकडून सतीश पठारे आदी इच्छुक आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात तांबे गटाकडून बाळासाहेब सरोदे, संतोष वाघमोडे, शाम पठारे, रोहोकले गटाकडून मीनाक्षी तांबे, सुजित बनकर, बाळासाहेब पाटोळे, रविंद्र कांबळे, अल्ताफ शहा, अरुण कवडे, गुरुकुल मंडळाकडून कल्पना बाविस्कर, संजय वाघ आदी इच्छुक आहेत.
राहुरी तालुक्यातुन तांबे गटाकडून रविकिरण साळवे, गोरख विटनोर, पंडित हजारे, अण्णा मोढे, ज्ञानदेव गागरे, रोहोकले गटाकडून कल्याण राऊत, किरण रोकडे, रविंद्र अरगडे, राजेंद्र पटेकर, गुरुकुल मंडळाकडून विठ्ठल वराळे, सुनिल लोंढे, राजेंद्र मरकाळ आदी इच्छुक आहेत. नेवासे तालुक्यात तांबे गटाकडून रामेश्वर चोपडे, विठ्ठल काळे, बापू सोनवणे, मीनाक्षी अवचरे, रोहोकले गटाकडून राजू मुंगसे, रविंद्र कडू, दत्ता चोभे, रेवनाथ पवार, गुरुकुल कडून भास्कर नरसाळे, किरण दहातोंडे, संदीप जंगले, बंडू जपकर, सदिच्छा कडून नवनाथ काळे, परशुराम आंधळे, राजाभाऊ बेहळे आदी इच्छुक आहेत.
पाथर्डी तालुक्यात तांबे गटाकडून ज्ञानेश्वर शिरसाठ, भिमराव चत्तर, पुष्पा विठ्ठल फुंदे, शिवाजी कराड, रोहोकले गटाकडून भागवत गर्जे, श्रीकृष्ण खेडकर, सचिन कराड, भागीनाथ बडे, तुषार तुपे, विठ्ठल देशमुख, बाळासाहेब शेळके, गुरुकुल कडून सिताराम सावंत, बाबासाहेब खेडकर, संजीवनी दौड, परिमल बाबर, अनुराधा फुंदे, बाळासाहेब गोलहार, अशोक आंधळे, अण्णा आंधळे, सदिच्छा कडून संतोष बोरुडे, उद्धव दौड, धर्मा बडे, सुरेश खेडकर, सुभाष खेडकर, रामदास दहिफळे, अनिल कराड, स्वराज्य कडून देवेंद्र आंबेडकर, रामदास दहिफळे आदी इच्छुक आहेत.
शेवगाव तालुक्यातुन तांबे गटाकडून निवृत्ती गोरे, एन सी शिंदे, रोहकले गटाकडून कल्याण पोटभरे, तांबे, गुरुकुल कडून रघुनाथ लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, दादा अकोलकर, सदिच्छा कडून बाळकृष्ण ढमाळ, रामकृष्ण काटे आदी इच्छुक आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातुन तांबे गटाकडून संदीप मोटे, गणेश गायकवाड, राजू राऊत, मनिषा सोनवणे, मनिषा कोथिंबीरे रोहोकले गटाकडून विकास डावखरे, संतोष खोमणे, राजू इथापे, बाळासाहेब मगर, गंगाराम वाघमारे, गुरुकुल मंडळाकडून शोभा कोकाटे, शिवाजी रायकर, दत्तात्रय शिंदे, प्रविण गांगरडे, मिलिंद पोटे, शुभांगी ईश्वरे आदी इच्छुक आहेत.
कर्जत तालुक्यातुन तांबे गटाकडून बाळासाहेब तापकीर, किशोर माकुडे, संदीप ठाणगे, उद्धव घालमोडे, दत्ता राऊत, रोहोकले गटाकडून मिलिंद तनपुरे, संतोष खंडागळे, प्रमोद गाडे, गुरुकुल कडून मधुकर रसाळ, इबटा कडून अशोक नेवसे, नवनाथ अडसूळ, शिक्षक भारती कडून दिनेश खोसे आदी इच्छुक आहेत.
जामखेड तालुक्यातुन तांबे गटाकडून संतोषकुमार राऊत, किसन वराट, मुकुंद सातपुते, दादा चव्हाण, निशा कदम, रोहोकले गटाकडून शिवाजी हजारे, निंबाळकर, नारायण लहाने, गुरुकुल कडून संतोष डमाळे, अनिल अष्टेकर, विजय जाधव आदी इच्छुक आहेत.
चौदा तालुक्यातुन जवळपास प्रत्येक मंडळाकडून किमान 15 ते 20 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यात अजूनही काही इच्छुक सहभागी होऊ शकतात. तसेच नेत्यांच्या मनातील काही उमेदवार पण उमेदवार यादीत समाविष्ट होतील. एकंदरीतच इच्छुकांची ही भाऊगर्दी नेत्यांची डोकेदुखी ठरणार असून यातून नाराजी, बंड, फोडाफोडी ही आव्हाने सर्वच मंडळाना सतावणार आहे!
स्वबळाच्या डरकाळ्या अन युती- आघाडीचे बाण
सर्वच मंडळ स्वबळाच्या डरकाळ्या फोडत अंतर्गत आघाडी- युतीच्या चाचपण्या पण करत आहेत. यातून आज कुणाशी कुणाची युती झाली व होणार अश्या आघाडी- युत्यांच्या रोजच्या चर्चेच्या बाजारगप्पा व अफवांना ऊत आला असला तरी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच्या आदल्या रात्री अंधारात सार्या घडामोडीवर शिक्कामोर्तब होईल! तोपर्यंत सारे आघाड्या- युत्यांचे बाण हवेतच विरणार आहेत.
GJWEmnirTwzqYUR