हंगेवाडी सोसायटी निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष । इधाते यांच्या कामावर सभासद समाधानी
श्रीगोंदा । वीरभूमी- 17-Jun, 2022, 05:16 PM
श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिणेला असलेल्या हंगेवाडी सोसायटीचा नावलौकिक सहकारात आदराने घेतला जातो. गेल्या दहा वर्षांपासून भगवान इधाते व बंडोबा रायकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांच्या विरोधात यावेळी सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याचे पाच संचालक एकत्रित येऊन पॅनल उभे केले आहे. यामुळे इधाते यांच्याबद्दल सभासदांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी भगवान इधाते यांनी गावातील प्रस्थापित नेत्यांविरोधात बंड करून पॅनल उभे केले. त्यांना सभासदांनी घवघवीत यश मिळवून दिले. श्री. इधाते यांनी अनेक विस्थापित कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना संस्थेत पदाधिकारी केले. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गावातील प्रस्थापित नेत्यांनी त्यांना निवडणुकीत भाग घेण्यास अटकाव केला. त्यामुळे थोड्या थोड्या मतांनी ग्रामपंचायतीला त्यांचे पॅनल पडले, याची सल गावातील नागरिकांना असल्याने श्री. इधाते राजकारणात असेलच पाहिजेत अशी भावना सामान्य सभासद मतदारांमध्ये आहे.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी संचालक तुळशीराम रायकर, तुकाराम रायकर, माऊली रायकर भाऊसाहेब कोळपे व विद्यमान संचालक लक्ष्मण रायकर या आजी - माजी पाच संचालकांनी एकत्रित येऊन भगवान इधाते यांच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून पॅनल उभे केले आहे. भगवान इधाते यांना गावातून हद्दपार करायचे अशी इर्षा विरोधक सभासदांमध्ये बोलून दाखवत आहेत. गावातील सर्व सत्ता एकाच पॅनलकडे गेल्यास सभासदांना भविष्यात न्याय मिळणार नाही. या भावनेतून श्री. इधाते यांचे पारडे जड झाले आहे.
भगवान इधाते यांना सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी संचालक बंडोबा रायकर यांनी साथ दिली आहे. श्री. इधाते यांच्या कार्यकाळात सभासदांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप झाल्याने व त्याच प्रमाणात शासनाच्या दोन कर्जमाफ्या झाल्यात त्यामूळे कोट्यावधी रुपयांचा गावाला फायदा झाला. यामुळे सभासदांमधुन श्री. इधाते यांच्या पॅनलबद्दल प्रचंड आकर्षण असल्याचे सभासदांमधून बोलले जाते.
डीव्हीडंट कोणीच दिला नाही मग हंगेवाडी कोठून देणार
हंगेवाडी सोसायटीने डीव्हीडंट दिला नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शेजारी गावातील वांगदरी, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, बोरी या गावांनी पाच वर्षात कोणताही डीव्हीडंट दिला नाही. या संस्थांसह हंगेवाडी सोसायटीला पाच वर्षात दोनदा कर्जमाफी आली. यामुळे डीव्हीडंट देता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
Comments