शेवगाव । वीरभूमी - 18-Jun, 2022, 07:57 PM
जि.प.अध्यक्षांनी दहिगाव गटामध्ये निधीतर भरपूर आणला परंतु त्यांनी काम करण्याऐवजी फक्त कॉन्ट्रॅक्टरच निर्माण केले ते फक्त टक्केवारीसाठी. विकास हा फक्त कागदावरच आहे अशी टीका जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी केेली.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे जनशक्तीची संवाद यात्रा व नवीन शाखा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला या वेळी सौ. काकडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनशक्तीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे होते.
तर कार्यक्रमासाठी राजू जिजा पातकळ, अॅड.मराठे भाऊसाहेब आबासाहेब राऊत, अशोक ढाकणे, लक्ष्मण पातकळ, लक्ष्मण घोंगडे, भागचंद कुंडकर, सूर्यकांत गवळी, शामराव खरात, बाळासाहेब नरके, अकबर शेख, शिवाजी आजबे, ज्ञानदेव मगर, डॉ.बापुसाहेब गादे, रामचंद्र गिरम, इ.प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मा.उपसरपंच भाऊसाहेब राजळे, राजेंद्र दामोदर चव्हाण, कडुबाळ घुले, गोविंद काळे, ज्ञानदेव खराडे, शिवनाथ बोरुडे, राजेंद्र गवळी, सुभाष कांबळे, यांनी जनशक्ती विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सौ.काकडे म्हणाल्या की, तालुक्याला जि.प.अध्यक्षपद मिळाले तेंव्हा वाटलं खूप विकास कामे तालुक्यात होतील. परंतु उलटेच झाले त्यांनी सर्व कामे एकट्या दहिगाव गटात आणून गल्लोगल्ली कॉन्ट्रॅक्टर तयार केले व तालुक्यातील इतर गट वाऱ्यावर सोडून दिले.
लाडजळगाव गटातील विकास कामे मुद्दामून कट केली. गोरगरिबांसाठी खूप कामे त्यांना करता आली असती परंतु अध्यक्षांनी नेहमीच विकास कामात खोडा घालण्याचे काम केले. आता जनता तुम्हाला माफ करणार नाही. शेतकऱ्यांच्या ऊस तोडीला एकरी १० हजार खर्चही यांच्या नियोजनामुळेच आला. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवा.
यांच्या घरात प्रत्येकाला पद पाहिजे पण आता एखाद्या गरीब माणसाला आम्ही सभापती करू शकतो फक्त तुमची साथ आम्हाला द्या. तालुक्यात तिसरा पर्याय आम्ही देत आहोत. असेही सौ.काकडे म्हणाल्या.
यावेळी अनेक महिला व पुरुष ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तरसे यांनी केले तर आभार मनोज घोंगडे यांनी केले.
Comments