अहमदनगर ः सर्व 14 तालुका पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर
पहा आपल्या गणाचे आरक्षण
अहमदनगर । वीरभूमी- 28-Jul, 2022, 01:49 PM
अहमदनगर जिल्ह्यातील 14 पंचायत समितीमधील 170 गणांची आज सोडत काढण्यात आली. ही सोडत प्रत्येक तहसील कार्यालयात शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होणार आहेत. या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची धाकधूक वाढली होती. मात्र आरक्षण जाहीर होताच अनेकांचा जीव भांड्यात पडला तर अनेकांचा हिरमोड झाला आहे.
आपल्या तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे. तालुका निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-
शेवगाव तालुका पंचायत समितीच्या 10 गणासाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) दहिगावन गण- सर्वसाधारण महिला, 2) एरंडगाव गण- सर्वसाधारण महिला, 3) चापडगाव गण - सर्वसाधारण, 4) मुंगी गण- सर्वसाधारण, 5) बोधेगाव गण - सर्वसाधारण महिला, 6) लाडजळगाव गण- सर्वसाधारण महिला, 7) भातकुडगाव गण- सर्वसाधारण, 8) वाघोली गण- अनुसुचित जाती, 9) अमरापूर गण- ना. मा. प्रवर्ग महिला, 10) आखेगाव गण- ना. मा. प्रवर्ग. याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
पाथर्डी तालुका पंचायत समिती आरक्षण सोडत
पाथर्डी तालुक्यातील 10 पंचायत समिती गणासाठी आज तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) कासारपिंपळगाव गण = सर्वसाधारण महिला, 2) कोरडगाव गण = सर्वसाधारण महिला, 3) तिसगाव गण = ना.मा.प्र. महिला, 4) माळीबाभुळगाव गण = सर्वसाधारण, 5) माणिकदौंडी गण = सर्वसाधारण, 6) टाकळीमानुर गण = अनुसुचित महिला, 7) मिरी गण = ना.मा.प्र. पुरूष, 8) करंजी गण = सर्वसाधारण, 9) भालगाव गण = सर्वसाधारण, 10) अकोला गण = सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
कर्जत पंचायत समिती आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-
कर्जत तालुक्यातील 10 पंचायत समिती गणासाठी तहसील कार्यालयात आज सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) निमगाव गांगर्डा गण- सर्वसाधारण महिला, 2) मिरजगाव गण - सर्वसाधारण महिला, 3) चापडगाव गण- सर्वसाधारण, 4) टाकळी खंडेश्वर गण- सर्वसाधारण महिला, 5) कोरेगाव गण- सर्वसाधारण, 6) आळसुंदे गण- ना. मा. प्र. महिला, 7) कुळधरण गण - अनुसुचित जाती महिला, 8) बारडगाव सुद्रिक गण- सर्वसाधारण, 9) राशिन गण - सर्वसाधारण, 10) भांबोरा गण - ना. मा. प्रवर्ग. याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
अकोले तालुक्यातील 12 पंचायत समिती गणांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) समशेरपुर गण. - सर्वसाधारण, 2) खिरविरे गण - सर्वसाधारण, 3) देवठाण गण - अनुसूचीत जमाती महिला, 4) गणोरे गण - अनुसूचीत जमाती महीला, 5) धुमाळवाडी गण - अनुसूचीत जमाती, 6) धामणगाव आवारी - अनुसूचीत जमाती महीला, 7) राजुर गण - अनुसूचीत जाती, 8) वारंघुशी गण - सर्वसाधारण महिला, 9) पाडाळणे गण - सर्वसाधारण महिला, 10) शेलद गण - सर्वसाधारण महिला, 11) कोतुळ गण - अनुसूचीत जमाती, 12) ब्राम्हणवाडा गण - अनुसूचीत जमाती. असे आरक्षण निघाले आहे.
जामखेड पंचायत समितीच्या 6 गणांसाठी तहसील कार्यालयात आज सोडत काढण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) साकत गण- सर्वसाधारण, 2) शिऊर गण- अनुसुचित जाती महिला, 3) जवळा गण- ना. मा. प्रवर्ग महिला, 4) अरणगाव गण- सर्वसाधारण, 5) खर्डा गण - सर्वसाधारण गण, 6) नान्नज गण- सर्वसाधारण महिला. याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
नेवासा पंचायत समितीच्या 16 गणांसाठी तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. ही सोडत पुढील प्रमाणे निघाली आहे.
पंचायत समिती गण- 1) बेलपिंपळगाव - ना. मा. प्रवर्ग महिला, 2) प्रवरासंगम- अनुसुचित जाती महिला, 3) खामगाव - सर्वसाधारण, 4) सलबतपूर- सर्वसाधारण, 5) कुकाणा - सर्वसाधारण, 6) भेंडा बु.- ना. मा. प्रवर्ग महिला, 7) मुकिंदपूर- सर्वसाधारण महिला, 8) भानसहिवरे - सर्वसाधारण महिला, 9) पाचेगाव - अनुसुचित जमाती, 10) करंजगाव - ना. मा. प्रवर्ग, 11) खरवंडी - सर्वसाधारण महिला, 12) शिंगणापूर- सर्वसाधारण महिला, 13) सोनई- सर्वसाधारण महिला, 14) घोडेगाव - अनुसुचित जाती, 15 चांदा - सर्वसाधारण, 16) देडगाव - ना. मा. प्रवर्ग. याप्रमाणे आरक्षण सोडत निघाली आहे.
पारनेर तालुका पंचायत समितीच्या 12 जागांसाठी तहसील कार्यालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत पुढील प्रमाणे निघाली आहे.
1) रांजणगाव मशिद गण- अनुसूचित जाती, 2) भाळवणी गण - अनुसूचित जमाती, 3) वासुंदे- नागरिकांचा मागास प्रवर्ग 4) वाडेगव्हाण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 5) सुपा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 6) ढवळपुरी गण- सर्वसाधारण व्यक्ती, 7) टाकळी ढोकेश्वर - सर्वसाधारण महिला, 8) कान्हूर पठार- सर्वसाधारण महिला, 9) वडझिरे- सर्वसाधारण महिला, 10) आळकुटी-सर्वसाधारण व्यक्ती, 11) निघोज- सर्वसाधारण व्यक्ती, 12) जवळा- सर्वसाधारण महिला.
राहाता तालुका पंचायत समितीच्या 12 गणांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत पुढील प्रमाणे निघाली आहे.
1) सावळीविहीर बु. - ना. मा. प्रवर्ग महिला, 2) पुणतांबा - अनुसुचित जमाती महिला, 3) वाकडी- सर्वसाधारण, 4) अस्तगाव - ना. मा. प्रवर्ग, 5) निमगाव कोर्हाळे - अनुसुचित जाती महिला, 6) साकुरी - सर्वसाधारण महिला, 7) पिंपरी निर्मळ - ना. मा. प्रवर्ग महिला, 8) बाभळेश्वर - सर्वसाधारण महिला, 9) लोणी खु. - सर्वसाधारण, 10) लोणी बु.- सर्वसाधारण, 11, कोल्हार बु. - सर्वसाधारण, 12) दाढ बु. - अनुसुचित जाती. याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
नगर तालुका पंचायत समितीच्या 14 गणांसाठी तहसील कार्यालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये गणांसाठीचे आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे.
1) देहरे - सर्वसाधारण, 2) वडगाव गुप्ता- ना. मा. प्रवर्ग, 3) जेऊर- अनु. जाती महिला, 4) शेंडी- ना. मा. प्रवर्ग, 5) नागरदेवळे - सर्वसाधारण, 6) बुर्हाणनगर- सर्वसाधारण महिला, 7) केकती- सर्वसाधारण महिला, 8) चिचोंडी पाटील- सर्वसाधारण, 9) दरेवाडी - सर्वसाधारण महिला, 10) अरणगाव - अनु. जाती, 11) नवनागापूर - ना. मा. प्रवर्ग महिला, 12) नेप्ती - सर्वसाधारण, 13) वाळकी - सर्वसाधारण महिला, 14) गुंडेगाव - सर्वसाधारण. याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
श्रीगोंदा तालुका पंचायत समितीच्या 14 गणांसाठी तहसील कार्यालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे.
1) देवदैठण गण- सर्वसाधारण, 2) पिंपळगाव पिसा- ना. मा. प्रवर्ग महिला, 3)कोळगाव गण - ना. मा. प्रवर्ग, 4) घारगाव गण- सर्वसाधारण महिला, 5) मांडवगण गण- सर्वसाधारण, 6) भानगाव गण- अनुसूचित जाती महिला, 7)आढळगाव गण- ना.मा. प्रवर्ग महिला, 8) पेडगाव गण-अनुसूचित जाती, 9) येळपणे गण- सर्वसाधारण महिला, 10) बेलवंडी गण- सर्वसाधारण महिला, 11)हंगेवाडी गण- सर्वसाधारण, 12) लिंपणगाव गण- सर्वसाधारण, 13) काष्टी गण-सर्वसाधारण, 14) अजनूज गण-अनुसूचित जमाती महिला. याप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
कोपरगाव पंचायत समिती गणाचे आरक्षण-
1) धामोरी- सर्वसाधारण, 2) सुरेगाव- नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला, 3) ब्राम्हणगाव- अनु जमाती, 4) शिंगणापूर- अनु.जाती, 5) करंजी बु.- सर्वसाधारण, 6) दहीगाव बोलका- नागरीकांचा मागास प्रवर्ग, 7) संवत्सर- अनु. जाती महीला, 8) कोकमठाण- सर्वसाधारण महीला, 9) जेऊर कुंभारी- सर्वसाधारण महीला, 10) कोळपेवाडी- अनु. जमाती महीला, 11) पोहेगाव- सर्वसाधारण, 12) रांजणगाव देशमुख - सर्वसाधारण महीला. असे आरक्षण निघाले आहे.
संगमनेर तालुका पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण-
1) घुलेवाडी - अनु. जाती, 2) जोर्वे- अनु. जाती महिला, 3) साकुर- अनु. जमाती, 4) अंभोरे- अनु. जमाती महिला, 5) निमोण- ना. मा. प्रवर्ग, 6) समनापूर- ना. मा. प्रवर्ग महिला, 7) तळेगाव- ना. मा. प्रवर्ग महिला, 8) आश्वी खु.- ना. मा. प्रवर्ग महिला, 9) वडगाव पान - ना. मा. प्रवर्ग, 10) कोकणगाव - सर्वसाधारण, 11) आश्वी खुर्द- सर्वसाधारण, 12) संगमनेर खुर्द - सर्वसाधारण, 13) गुंजाळवाडी - सर्वसाधारण महिला, 14) राजापूर - सर्वसाधारण महिला, 15) धांदरफळ बु. - सर्वसाधारण, 16) चंदनापुरी - सर्वसाधारण महिला, 17) पेमगिरी - सर्वसाधारण महिला, 18) वरवंडी - सर्वसाधारण, 19) खांदरमाळ वाडी - सर्वसाधारण, 20) बोटा- सर्वसाधारण महिला. असे आरक्षण निघाले आहे.
राहुरी तालुका पंचायत समिती गणांचे आरक्षण-
1) कोल्हार - सर्वसाधारण, 2) सात्रळ- सर्वसाधारण, 3) टाकळीमियाँ- अनु. जाती महिला, 4) मांजरी- सर्वसाधारण, 5) मानोरी- अनु. जमाती, 6) उंबरे- अनु. जाती, 7) ताराहाबाद- सर्वसाधारण, 8) गुहा- सर्वसाधारण महिला, 9) बारागाव नांदूर- ना. मा. प्रवर्ग, 10) राहुरी खुर्द - ना. मा. प्रवर्ग महिला, 11) वांबोरी- ना. मा. प्रवर्ग महिला, 12) ब्राम्हणी- सर्वसाधारण महिला. असे आरक्षण निघाले आहे.
श्रीरामपूर तालुका पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे-
1) निमगाव खैरी- अनु. जमाती, 2) उंदिरगाव - अनु. जाती, 3) टाकळीभान - सर्वसाधारण महिला, 4) शिरसगाव - अनु. जाती महिला, 5) दत्तनगर - सर्वसाधारण, 6) उक्कलगाव - सर्वसाधारण महिला, 7) बेलापूर बु. - ना. मा. प्रवर्ग, 8) पढेगाव - सर्वसाधारण महिला, 9) निपाणी वडगाव - सर्वसाधारण, 10) कारेगाव- ना. मा. प्रवर्ग महिला. असे आरक्षण निघाले आहे.
Tags :
Comments