झेडपीच्या सर्व गटाची आरक्षण सोडत जाहीर
पहा आपल्या गटाचे सर्व तालुकानिहाय आरक्षण
अहमदनगर । वीरभूमी- 28-Jul, 2022, 03:38 PM
अहमदनगर जिल्हा परिषदेचे 85 गट आहेत. प्रशासनाने यापूर्वी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जातीच्या 11 व अनुसूचित जमातीच्या 8 जागा आरक्षित असणार आहेत. तसेच ओबीसीसाठी 22 व उर्वरित 44 जागा सर्वसाधारण गटासाठी राहणार आहेत. यात 50 टक्के महिलांचे आरक्षण जाहीर झाले आहे.अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गटाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यावेळी प्रशासनाचे अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित आहेत.
तालुका निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-
अकोले तालुका- 1) समशेरपूर (सर्वसाधारण), 2) देवठाण (सर्वसाधारण महिला), 3) धुमाळवाडी (एसटी महिला), 4) राजूर (ना. मा. प्रवर्ग), 5) पाडाळणे (ना. मा. प्रवर्ग), 6) कोतूळ (सर्वसाधारण महिला).
संगमनेर तालुका - 1) समनापूर (सर्वसाधारण महिला), 2) तळेगाव (ना. मा. प्रवर्ग), 3) आश्वी बुद्रुक (एसटी महिला), 4) जोर्वे (सर्वसाधारण), 5) संगमनेर खुर्द (सर्वसाधारण), 6) घुलेवाडी (एससी महिला), 7) धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण महिला), 8) चंदनापुरी (सर्वसाधारण महिला), 9) साकुर (सर्वसाधारण), 10) बोटा (सर्वसाधारण).
कोपरगाव तालुका- 1) सुरेगाव (एसटी), 2) शिंगणापूर (एसटी महिला), 3) करंजी बुद्रुक (ना. मा. प्रवर्ग महिला), 4) संवत्सर (सर्वसाधारण महिला), 5) कोळपेवाडी (सर्वसाधारण महिला). 6) पोहेगाव बुद्रुक (सर्वसाधारण).
राहाता तालुका- 1) पुणतांबा (सर्वसाधारण महिला), 2) वाकडी (सर्वसाधारण महिला), 3) साकुरी (सर्वसाधारण), 4) बाभळेश्वर (सर्वसाधारण महिला), 5) लोणी खुर्द (सर्वसाधारण महिला), 6) कोल्हार बु. (ना. मा. प्रवर्ग).
श्रीरामपूर तालुका- 1) उंदीरगाव (ना. मा. प्रवर्ग), 2) टाकळीभान (सर्वसाधारण महिला), 3) दत्तनगर (ना. मा. प्रवर्ग महिला), 4) बेलापूर (ना. मा. प्रवर्ग), 5) निपाणी वडगाव (सर्वसाधारण महिला).
नेवासा तालुका- 1) बेलपिंपळगाव (एसटी महिला), 2) सलाबतपूर (सर्वसाधारण महिला), 3) भेंडा बुद्रुक (सर्वसाधारण महिला), 4) भानसहिवरे (ना. मा. प्रवर्ग महिला), 5) पाचेगाव (एसटी), 6) शनिशिंगणापूर (सर्वसाधारण महिला), 7) सोनई (ना. मा. प्रवर्ग महिला), 8) चांदा (एससी महिला).
शेवगाव तालुका - 1) दहिगावने (ना. मा. प्रवर्ग), 2) मुंगी (ना. मा. प्रवर्ग महिला), 3) बोधेगाव (ना. मा. प्रवर्ग), 4) भातकुडगाव (ना. मा. प्रवर्ग महिला), 5) अमरापूर (एससी).
पाथर्डी तालुका- 1) कासार पिंपळगाव (सर्वसाधारण महिला), 2) भालगाव (सर्वसधारण), 3) माळीबाभूळगाव (सर्वसाधारण), 4) मिरी (सर्वसाधारण), 5) टाकळी मानूर (सर्वसाधारण).
राहुरी तालुका- 1) सात्रळ (ना. मा. प्रवर्ग), 2) टाकळी मियाँ (सर्वसाधारण महिला), 3) उंबरे (ना. मा. प्रवर्ग), 4) गुहा (सर्वसाधारण), 5) बारागाव नांदूर (एसटी), 6) वांबोरी (सर्वसाधारण).
नगर तालुका- 1) वडगाव गुप्ता (सर्वसाधारण महिला), 2) जेऊर (सर्वसाधारण महिला), 3) नागरदेवळे (ना. मा. प्रवर्ग महिला), 4) चिचोंडी पाटील (सर्वसाधारण महिला), 5) दरेवाडी (सर्वसाधारण), 6) नवनागापूर (एससी महिला), 7) वाळकी (सर्वसाधारण).
पारनेर तालुका - 1) ढवळपुरी (एसटी), 2) टाकळी ढोकेश्वर (सर्वसाधारण), 3) कान्हुर पठार (ना. मा. प्रवर्ग महिला), 4) निघोज (सर्वसाधारण), 5) जवळा (सर्वसाधारण), 6) सुपा (सर्वसाधारण).
श्रीगोंदा तालुका- 1) पिंपळगाव पिसा (सर्वसाधारण महिला), 2) कोळगाव (एससी महिला), 3) मांडवगण (एससी महिला), 4) आढळगाव (एससी), 5) बेलवंडी (एससी), 6) लिंपणगाव (सर्वसाधारण), 7) काष्टी (सर्वसाधारण).
कर्जत तालुका- 1) मिरजगाव (एससी महिला), 2) चापडगाव (एससी), 3) कोरेगाव (एससी), 4) कुळधरण (सर्वसाधारण), 5) राशीन (ना. मा. प्रवर्ग महिला).
जामखेड तालुका- 1) साकत (ना. मा. प्रवर्ग), 2) जवळा (ना. मा. प्रवर्ग), 3) खर्डा (ना. मा. प्रवर्ग)
या प्रमाणे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण निघाले आहे. अनेक ठिकाणी इच्छुकांच्या सोईचे आरक्षण निघाले तर काही ठिकाणी अडचणीचे. यामुळे अनेकांच्या चेहर्यावर ‘कभी खुशी कभी गम’ अशी परिस्थिती पहायला मिळाली.
Tags :
rKxYAyGf