शेवगाव । वीरभूमी - 30-Sep, 2022, 02:20 AM
महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजीचे शासन निर्णयाप्रमाणे ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे (लेखाशीर्ष2515) योजनेअंतर्गत शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
लेखाशिर्ष 25-15 अंतर्गत मंजूर कामांमध्ये शेवगाव तालुक्यातील मौजे लाखेफळ अंतर्गत कराड वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 30 लक्ष), मौजे दहिगाव-शे अंतर्गत हुमरे वस्ती (खामपिंपरी रस्ता) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 60 लक्ष), मौजे दहिफळ जुने अंतर्गत रानमळावस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 25 लक्ष).
मौजे वरुर अंतर्गत वरुर ते अमरापुर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 60 लक्ष), मौजे लाडजळगाव अंतर्गत धनगरवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 40 लक्ष), मौजे हातगाव अंतर्गत राम मंदिर ते दिवटे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 30 लक्ष), मौजे बालमटाकळी अंतर्गत फकीर बाबा वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे( रक्कम 45 लक्ष लक्ष) या कामांचा समावेश आहे.
पाथर्डी तालुक्यातील मौजे बोरसेवाडी अंतर्गत बाबा बोरसे वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे (रक्कम 20 लक्ष), मौजे मोहटे अंतर्गत गावठाण ते जुने मोहटे महादेव मंदिर रस्ता मजबतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 40 लक्ष).
मौजे आल्हनवाडी अंतर्गत गव्हाणे आवटी वस्ती रस्ता मजबतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 50 लक्ष), मौजे पिरेवाडी अंतर्गत नागतळे रोड ते आठरवाडी जोड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 40 लक्ष), मौजे वडगाव अंतर्गत वाघेश्वरी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (रक्कम 60 लक्ष) या कामांचा समावेश आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत पुरेसा निधी न मिळाल्यामुळे मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबित राहिले आहेत, सध्या राज्यात भाजप समविचारी पक्षाचे शासन असून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघातील जास्तीत जास्त प्रलंबित विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लेखाशीर्ष 2515 अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे मंत्री गिरीशजी महाजन यांचे विशेष आभार मानले.
swyLaXHnvqdI