अकोले । वीरभूमी - 06-Oct, 2022, 10:34 AM
कायम विना अनुदानित तत्वावर चालू असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोले या संस्थेतील वीज वितरण कंपनी मध्ये सध्या कार्यरत असलेले संस्थेचे माजी विद्यार्थी शिवदास देशमुख, अप्पा गायकवाड, विशाल देशमुख, एकनाथ वाकचौरे, संतोष वारे, दिनेश मंडलिक, ज्ञानेश्वर नेहे, रियाज शेख, अंकुश डावरे, खंडू म्हशाळ, नवनाथ देशमुख, मंगेश देशमुख व विभागीय अभियंता ज्ञानेश बागुल यांनी फिटर व वेल्डर ट्रेड ची गरज लक्षात घेऊन ‘14 इंची कट ऑफ मशीन’ सप्रेम भेट दिली. स्कंद नवमीच्या निमित्ताने आयोजित मशिनरी पूजन कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी ही भेट दिली.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात शिवदास देशमुख व आप्पा गायकवाड यांचा सत्कार फ्लयव्हील रिंग गिअर्स कंपनी चे जनरल मॅनेजर सतीश नेहे, उद्योजक भारत पिंगळे, संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, स्था.व्य. समितीचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे, कार्यकारीणी सद्स्य शरदराव देशमुख, सुधाकरराव आरोटे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवदास देशमुख म्हणाले की, या स्कंद नवमीच्या निमित्ताने मशिनरी पूजन कार्यक्रम हा साधने, हत्यारे मशिनरी यांच्या प्रति कृतज्ञाता व्यक्त करण्याचा दिवस असून सर्व विद्यार्थ्यांनी आपण वापरत असलेल्या हत्यारांचा सन्मान ठेवावा, त्यांच्या विषयी आदर ठेवावा. या संस्थेने व प्राचार्य, निदेशक कर्मचारी यांनी आम्हाला घडविले, ही संस्था म्हणजे ऊर्जा स्थान आहे.
येथे विद्यार्थी नेहमी चार्ज होतात. आपण ज्या संस्थेत शिकतो, त्या संस्थे प्रति आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून आम्ही संस्थेला छोटीशी मदत केली. आपणही आपली कर्तृत्व भावना जपावी. व संस्था आपल्यासाठी जे उपक्रम राबविते त्या संधीचा फायदा घ्यावा.सर्वानी संस्थेविषयी आदर ठेवावा, असे मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गट निदेशक मच्छिंद्र गायकर, निदेशक संतोष हासे, पी. बी. नवले, अरुण भालेराव, संदीप देशमुख, बाबासाहेब धुमाळ, भास्कर वैद्य, अक्षय घुले, निलेश थटार, सतिश वैद्य, भरत धुमाळ, दौलत धुमाळ हे उपस्थित होते.
प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी माजी विद्यार्थी यांचे आभार मानले.
Comments