अगस्तिचे 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दीष्ट्ये
अध्यक्ष सीताराम गायकर । अगस्ती कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन
अकोले । वीरभूमी - 06-Oct, 2022, 10:38 AM
सभासदांनी केलेले प्रेमाचे जोरावर जिवाचे रान करु. परंतु कारखाना सक्षमपणे चालवुन या हंगामात 6 लाख मे. टनापर्यत गाळप पूर्ण करु, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा 29 वा बॅायलर प्रदिपन सोहळा योगी केशव बाबा चौधरी यांचे शुभहस्ते व, आ. डॉ.किरण लहामटे, चेअरमन सीताराम गायकर, व्हा.चेअरमन अशोकराव भांगरे, यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी जिल्हा बॅक संचालक अमित भांगरे, कॉ. कारभारी उगले, डॉ. अजित नवले, आरपीआय नेते विजयराव वाकचौरे, माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, बाळासाहेब ताजणे, जि.प.सदस्या सौ. सुनिताताई भांगरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, डॉ. संदिप कडलक, गुलाबराव शेवाळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ स्वातीताई शेणकर, अॅड. वसंत मनकर, शरद चौधरी, नुतन संचालक रामनाथ बापू वाकचौरे, मिनानाथ पांडे, अशोकराव देशमुख, विक्रम नवले, सुधीर शेळके, विकास शेटे, सचिन दराडे, मनोज देशमुख, पाटीलबा सावंत, प्रदिप हासे, पर्बतराव नाईकवाडी, अशोक आरोटे, बादशहा बोंबले, कैलास शेळके, सौ. सुलोचना नवले, सौ. शांताबाई वाकचौरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
सिताराम पा. गायकर म्हणाले की, आजचा हा खुप आनंदाचा क्षण आहे. हा हंगाम सुरु करण्यासाठी माझ्या जुन्या संचालकाचे खुप मोठे योगदान आहे निवडणूक पुढे ढकलली असताना हंगामाचा प्रश्न उभा राहिला असताना खुप मोठे मोलाचे योगदान मागील संचालकांनी दिले आहे. 29 कोटी थकबाकी असताना नविन कर्ज मिळणार नाही अशी परिस्थिती असताना आमचे नेते अजितदादा पवार, आ. बाळासाहेब थोरात यांचे माध्यमातुनच जिल्हा बँकेतुन कर्ज उपलब्ध होऊ शकले व हंगामापूर्वीची तयारी पुर्ण होउ शकली. सहा लाखांचे गाळप केल्याशिवाय कारखाना तोडाला तोड मिळवू शकत नाही म्हणून 6 लाख मे. टनाचे गाळप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
साखर सोडून इतर उत्पादन नाही अशा कारखान्यानां एफआरपी देण्यासाठी तोटा होतो. आपल्या कारखान्याचेही इतर उत्पादन नसल्याने दरवर्षी तोटा होतो. सुरुवातीलाच डिस्टलरी प्रोजेक्ट झाला नसल्याने मोठे नुकसान कारखान्याचे झाले आहे.कारखान्याचा तोटा भरून काढण्यासाठी इथेनॅाल प्रकल्पावर अपेक्षा आहे. हे वर्ष कारखान्याचे भविष्यासाठी खुप गरजेचे आहे.त्यामुळे काटकसर, मेहनतीने चांगल्या पद्धतीने कारखाना चालविण्यासाठी आता सर्वाची भक्कम साथ आहे. खुप प्रयत्न करुन कारखाना सक्षम व कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
आ. लहामटे म्हणाले, मी गेल्या वर्षी कारखान्याचे मोळीच्या कार्यक्रमाला आलो. त्याचवेळी विचार केला, हा कारखाना देशाचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांचे नेतृत्वाखाली यावा आणि आज ते खरे ठरले आहे. कारखाना प्रशासन चालवताना कसलाही हस्तक्षेप होउ देणार नाही.
संचालकांच्या गाड्याना डिजेल आदी इतर वायफट खर्च होऊ देवु नका. ऊस उत्पादक सभासदांना जसा सन्मान कारखान्याकडुन होतो तसाच बिगर उत्पदक सभासदांचाही करावा. कारखान्यावर कोणत्याही पक्षाचा नेता येवो, त्याचा सन्मान केला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वाकडुन चांगले काम होवुन कारखाना सुव्यवस्थित चालु राहावा यासाठी सदिच्छा दिल्या.
कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे म्हणाले की, शेतकर्यांच्या अपेक्षेप्रमाणे हा कारखाना चालविण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. पुढील काळात ऊस वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन तालुक्यातच 5 ते 6 लाख टन उत्पादन झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करावयचा आहे. चालु हंगामात 30 कोटी रूपयांची बचत करुन कर्जफेडीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करावे.
कारखाना नफ्यात आणण्यासाठी सहकार्य गरजेचे आहे. भविष्यात आपल्याला कारखाना स्वयंभू करायचा आहे. आम्ही जोपर्यत आहे, तोपर्यत हा कारखाना बंद पडू देणार नाही. कारखाना चालविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी आशिर्वाद देताना महंत योगी केशव बाबा म्हणाले, वैचारिक मतभेद झाले तरी मनभेद होऊ देवु नका. कारखाना जरी तोट्यात असला तरी गायकर साहेब कारखाना सुरळीत चालवतील. त्यांना सर्वानी प्रामाणिकपणे साथ द्यावी. गायकरांनी अनेक प्रसंगाना समर्थपणे तोंड दिले. त्यामुळे येत्या काळातही सर्व प्रसंगाना तोंड देवून कारखाना सुरळीत चालवतील.
यावेळी कृषी भूषण किसनराव पोखरकर, मारुती मेंगाळ, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर, सुरेश नवले, भीमाबाई रोकडे, रावसाहेब वाळुंज, गोरख मालुंजकर, रोहिदास भोर, नगरसेवक नवनाथ शेटे, युनियन अध्यक्ष शरद नेहे, संदिप शेणकर, प्रवीण मालुंजकर, अरुण रुपवते, नितिन नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, आदीसह शेतकरी सभासद, कारखान्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके व केन मॅनेजर सयाजी पोखरकर यांनी केले तर कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी आभार मानले.
IXcxkbVdB