शेवगाव । वीरभूमी- 06-Oct, 2022, 11:45 PM
माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या शेवगाव तालुक्यातील 12 व पाथर्डी तालुक्यातील 11 अशा 23 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. अशा 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 31 मे 2022 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दि. 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. तर दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतीमध्ये शेवगाव तालुक्यातील 12 तर पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील खामगाव, भायगाव, प्रभुवाडगाव, कुरुडगाव/रावतळे, खानापूर, जोहरापूर, रांजणी, दहिगावने, वाघोली, आखेगाव तितर्फा, अमरापूर व सुलतानपूर खुर्द या ग्रामपंचायतीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील भालगाव, वडगाव, कोळसांगवी, सोनोशी, कोरडगाव, जिरेवाडी, निवडूंगे, मोहरी, वैजुबाभूळगाव, तिसगाव व कोल्हार या ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.
शेवगाव व पाथर्डी तलुक्यातील मतदार यादी कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या लोकसंख्येच्या व राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे वरील गावांमधील राजकीय वातावरण तापणार आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात येणार्या मतदार यादी कार्यक्रमानंतर म्हणजे दिवाळीनंतर वरील ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे अवघ्या काही दिवसात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.
Mahadev purnale