मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी मुल्य आयोगाकडे मागणी
पुणे । वीरभूमी - 09-Nov, 2022, 09:25 PM
इथेनॉलचे उत्पन्न रंगराजन शिफारशीनुसार उत्पन्नात ग्रहीत धरावे. शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने एफ. आर. पी. चे सुत्र बदलून एफ. आर. पी. मध्ये वाढ करावी, अशी मागणी स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी कृषी मुल्य आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत स्वाभिमानीचे मा. खा. राजू शेट्टी यांनी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्यांना एफ. आर. पी. नुसार दर देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. मात्र केंद्र सरकारने हा निर्णय घेतला त्यावेळी ऊसापासून मिळणार्या उपपदार्थात इथेनॉलचे धोरण अस्तित्वात नव्हते.
यामुळे साखर कारखान्यात तयार होणार्या इथेनॅालचे उत्पादन ग्रहीत न धरल्याने सध्या ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने एफ. आर. पी.चे सूत्र बदलावे.
केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना ऊस दर देण्यासाठी ठरवलेले एफ. आर. पी. सुत्रात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सुत्रात बदल करुन साखर कारखान्यातील उपपदार्थ इथेनॉल उत्पन्न पकडून एफ. आर. पी. मध्ये वाढ करावी.
यासाठी इथेनॅालचे उत्पन्न रंगराजन शिफारशीनुसारच्या उत्पन्नात पकडून एफ. आर. पी. द्यावी. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी मागणी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॅाल शर्मा यांचेकडे केली आहे.
Comments