निवडणूक कार्यालयाचे ठिकाण बदललेः निवणडूक निर्णय अधिकारी दीपक पराये यांची माहिती
अकोले । वीरभूमी - 16-Nov, 2022, 12:37 AM
अमृतसागर सहकारी दुध व्यवसायिक संघ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक कार्यक्रमातील निवडणूक कार्यालयाचे ठिकाण बदलले आहे.तर ते अहमदनगर ऐवजी अकोले येथील सहाय्यक निंबधक सहकारी संस्था हे असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पराये यानी दिली आहे.
अमृतसागर सहकारी दुध संघ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये जाहीर झालेल्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. त्यामध्ये असणारे निवडणूक कार्यक्रमातील निवडणुकीचे कार्यालयाचे ठिकाण बदलण्यात आले असून ते अहमदनगर ऐवजी अकोले करण्यात आलेले आहे.
उर्वरित कार्यक्रम हा ठरल्या प्रमाणे व जाहीर झाल्या प्रमाणेच असेल. ह्या करण्यात आलेल्या बदलास सहा. सहकारी निवडणूक आयुक्त वसंत पाटील यांनी मान्यता दिली असून तसे प्रसिध्द करावे अशा सुचना केल्या आहेत.
पूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची दि.11 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022, उमेदवारी अर्ज छाननी दि.18 नोव्हेंबर 2022 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि.21 नोव्हेंबर 2022 ते 5 डिसेंबर 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
उमेदवारांना निशाणीचे वाटप 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल.तसेच आवश्यकता वाटल्यास 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी मतदान संपल्या नन्तर लगेच होईल.
संघाच्या सर्वसाधारण 10, महिला राखीव 2, इतर मागास वर्ग 1, अनुसूचित जाती जमाती 1, भटक्या विमुक्त जाती 1 अशा एकुण 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे, असे ही श्री. पराये यानी सांगितले.
तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश नारायण कापसे, सहकार अधिकारी, श्रेणी -2, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. अकोले हे काम पहातील.
Comments