गैरप्रकारांस उत्तेजन देत असल्याचा ठपका
कर्जत । वीरभूमी - 19-Dec, 2022, 10:00 AM
तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी. तसेच अशी कृत्ये करण्यास जागा उपलब्ध करून देणे. त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे आकारणार्या कर्जत शहरातील चार कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.
कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स येथील कॉफी अन् बरच काही, मुनलाईट, फ्रेंडशिप आणि द कॉफी पॉईंट अशी कॉफी शॉप आहेत. याठिकाणी मुला-मुलींना, तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच कॉफीशॉपमध्ये बसून ज्यादा पैसे देत अनेक चुकीच्या गोष्टी होत असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना प्राप्त झाली होती.
सदरच्या तक्रारीवरून पोनि. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकारी, पोलीस जवान आणि महिला पोलीस कर्मचार्यांनी नुकतेच स्टिंग ऑपरेशन केले. कॉफीशॉपमध्ये कॉफी पिण्याच्या बहाण्याने आलेले युगुल, तरुण-तरुणी बराचवेळ बसतात. त्यामुळे कॉफी शॉप चालकांनी खास युगुलांसाठी वेगळे दरपत्रक देखील बनवले असल्याचे समोर आले. यासाठी खास बैठक व्यवस्था असून तरुण तरुणींना अश्लील हावभाव, अश्लील कृत्ये, गैरप्रकार करणे सहज शक्य होत असल्याचे निदर्शनास आले.
यासह कॉफीशॉप मालकाकडुन विनापरवाना विविध खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याचे दिसून आले. कर्जत पोलिसांनी ‘महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कॉफी शॉपचालक पांडुरंग शिवाजी चव्हाण (कोरेगाव), सुमित सुदाम नेटके (बर्गेवाडी), महेश संजय बरबडे (गायकरवाडी) आणि आकाश विलास तोरडमल (बहिरोबावाडी) या चौघांवर कारवाई केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सलीम शेख, शाहूराज तिकटे, राणी व्यवहारे, रानी पुरी आदींनी केली आहे.
याबाबत पोनि. चंद्रशेखर यादव म्हणाले की, कॅफे चालकांनी तयार केलेली वेगळी बैठक व्यवस्था काढण्यास सांगितले आहे. यासह पालकांनीही आपली पाल्ये शाळेत-महाविद्यालायतच जातात का? ती काय करतात ? याबाबत वेळोवेळी खात्री करावी. आपल्या मुलांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करून ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत यासाठी यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे सांगितले.
nBxsqiHr