शेवगाव । वीरभूमी- 23-Dec, 2022, 12:23 PM
राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने दडपशाहीचे राजकारण करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन केले. हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी करत शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला.
याबाबत शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘सभागृहात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी’ अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी पक्षांचे आमदार यांनी विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बोलत होते.
मात्र सत्ताधारी पक्षाचे 14 लोकप्रतिनिधी या विषावर बोलत होते. तर विरोधी पक्षांकडून एकाच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही, हा विरोधी पक्षावर अन्याय आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेत असतांनाही विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज 5 वेळा तहकुब केले गेले. या सरकारच्या कामकाजाविरोधात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आवाज उठवला. त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही.
परंतू केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जयंत पाटील यांच्यावरील कारवाई तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत शिंदे-फडणवीस सरकारच्या दडपशाहीचा शेवगाव राष्ट्रवादीकडून निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, अरूण पा. लांडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाणे, युवक तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, शहरध्यक्ष कमलेश लांडगे, नानापाटील मडके, प्रदीप काळे, कैलास तिजोरे, संतोष जाधव, वाहाब शेख, समिर शेख, तुफैल मुलानी, महेश दातीर, संकेत वांढेकर, गोविंद किंडमिचे, अशफाक पठाण, गणेश साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
RKgsYButDI