अमृतसागर दुधसंघावर शेतकरी विकास मंडळाचा विजय
15 पैकी 13 जागा जिंकून माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सत्ता । आ. डॉ. किरण लहामटे यांना धक्का
अकोले । वीरभूमी- 08-Jan, 2023, 11:18 PM
अमृतसागर सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत 15 जागा पैकी शेतकरी विकास मंडळाला 13 तर शेतकरी समृध्दी मंडळाला 2 जागा मिळाल्या. शेतकरी विकास मंडळाला सर्वाधीक जागा मिळाल्याने माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांचे निर्विवाद बहूमत मिळाले.
अमृतसागर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत 130 पैकी 130 मतदारांनी मतदान केले. सकाळी 8 वाजता कन्या विद्या मंदिर येथे मतदान सुरु होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. शाळेच्या परिसरात आज मोठी गर्दी पहायला मिळाली. अत्यंत खेळीमेळीचे वातावरणात मतदान पार पडले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पराये यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेत जवळपास 10 कर्मचार्यांनी काम पाहिले. दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 4.30 वाजता मतमोजणीला सुरवात झाली तर 5.30 ला निकाल हाती आला. अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक प्रक्रिया संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राबाहेर आजी- माजी आमदारांसह राजकीय नेते कार्यकर्तेसह तळ ठोकून होते.
मतदानानंतर लगेच कन्या विद्यालयात मतमोजणी सुरु झाली. यावेळी एक ते दिड तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहिर करण्यात आला. यावेळी माजी आ. पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सर्वसाधारण मतदार संघातील 8, अनुसूचीत जाती जमाती मतदार संघातून 1, महिला राखीव 2, भ.जा.वि.जमाती 1, इतर मागासप्रवर्ग 1 असे 13 उमेदवार विजयी झाले. तर आ. डॉ. किरण लहामटे यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्वसाधारण मतदार संघातील 2 उमेदवार विजयी झाले.
अतिशय प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत माजी आ.वैभवराव पिचड गटाने एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय आमदार डॉ.किरण लहामटे यांना विचार करायला लावणारा आहे. अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी हा दुसरा धक्का आमदार डॉ. किरण लहामटे यांना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली. अर्थात हा विजय माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अमृतसागर दूध संघात चांगले काम केलेले असल्याने मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिली.
या निवडणुकीत मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- अनुसुचित जाती/जमाती प्रतिनिधी- नंदू संपत गंभीरे (33 पराभूत, शेतकरी समृद्धी), वैभवराव मधुकरराव पिचड (97 विजयी, शेतकरी विकास).भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रतिनिधी- सुभाष विठ्ठल बेनके (55 पराभूत, शेतकरी समृद्धी), बाबुराव शंकर बेनके (75 विजयी, शेतकरी विकास). इतर मागासवर्ग प्रतिनिधी- रामहरी गोपीनाथ तिकांडे (49 पराभूत, शेतकरी समृद्धी), आनंदराव रामभाऊ वाकचौरे (81 विजयी, शेतकरी विकास). महिला राखीव प्रतिनिधी- शेतकरी सृमृद्धी मंडळ- अर्चना गौराम गजे (51 मते), नलिनी भाऊसाहेब गायकर (51 मते, दोन्ही पराभूत), शेतकरी विकास मंडळ- अश्विनी प्रविण धुमाळ (79 मते), सुलोचना भाऊसाहेब औटी (75 मते, दोन्ही विजयी).
सर्वसाधारण मतदार प्रतिनिधी- शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार (कंसात मते)- आप्पासाहेब दादापाटील आवारी (80, विजयी), रामदास किसन आंबरे (66, विजयी), अरुण दिनकर गायकर (64, विजयी), बबन किसन चौधरी (69, विजयी), सुभाष सूर्यभान डोंगरे (73, विजयी), जगन वसंत देशमुख (66, विजयी), गंगाधर गणपत नाईकवाडी (65, विजयी), रावसाहेब रामराव वाकचौरे (76, विजयी), बाळासाहेब भाऊराव मुंढे (60, पराभूत), दयानंद नामदेव वैद्य (61, पराभूत).
शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार (कंसात मते)- शरद कारभारी चौधरी (66 विजयी), गोरक्ष गणपत मालुंजकर (71 विजयी), सुरेशराव संपत गडाख (63, पराभूत), प्रतापराव लक्ष्मण देशमुख (55, पराभूत), शिवाजी लक्ष्मण नवले (51, पराभूत), सोपान काशिनाथ मांडे (55, पराभूत), दादापाटील रामभाऊ वाकचौरे (50, पराभूत), गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे (58, पराभूत), विजय रंगनाथ शिंदे (45, पराभूत), रविंद्र पोपट हांडे (47, पराभूत).
मतमोजणी झाल्यानंतर कार्यकर्त्यानी अतिषबाजी करत जल्लोषात गुलालाची उधळण करत विजयोत्सव केला. यावेळी मा.आ.वैभवराव पिचड यांनी दूध संघात केलेल्या कामाची पावती सभसदांनी दिल्याची भावना व्यक्त केली.
oCYEbwhlzZFH