मुलगा सत्यजीतसाठी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही
अहमदनगर । वीरभूमी - 12-Jan, 2023, 04:14 PM
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीकडून आ. डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. आज उमेदवारी अर्जही दाखल करण्यात येणार होता. हातात काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी मुलासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्यजीत तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाने कोणलाही उमेदवारी दिली नसल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी म्हटले आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आज ट्विस्ट पहायला मिळाला. नाशिक पदवीधर मतदार संघातून विद्यमान आ. डॉ. सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. मात्र हातात पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म असतांनाही मुलासाठी डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आज सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अनेक दिवसापासून आ. डॉ. सुधीर तांबे काँग्रेसकडून तर राजेंद्र विखे भाजपाकडून उमेदवार असतील अशा चर्चा सुरु होत्या. त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांनी मतदार नोंदणीपासून फिल्डिंग लावली होती. मात्र पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत भाजपाकडून उमेदवार जाहीर केला जात नव्हता.
तर काँग्रेसने एक दिवस अगोदरच काँग्रेसची उमेदवारी डॉ. सुधीर तांबे यांना जाहीर केली होती. त्यातच भाजपा सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला. यामुळे डॉ. सुधीर तांबे यांनी हातात काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म असूनही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांनी मुलासाठी काँग्रेसची उमेदवारी मागितली. मात्र सत्यजीत तांबे यांना वेळेत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.
तर भाजपाने नाशिक पदवीधर मतदार संघातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन इतर पक्षांना पाठिंबा मागणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाची ताकद असलेल्या नशिक पदवीधर मतदार संघात ऐनवेळी भाजपाने कोणालाही उमेदवारी न देता गेम केला आहे. मतदारसंघात काँग्रेसची ताकद असल्याने सत्यजीत तांबे विजयी होतीलही मात्र ते काँग्रेस पक्षाचे असणार नाहीत. हाच डाव भाजपाने यशस्वी केल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
आपल्या महाराष्ट प्रदेश येथे रेल्वे विस्ताराला खूप वाव आहे तो होणे ही काळाची गरज आहे