संवत्सर, थेरगाव जिल्ह्यात प्रथम । प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड
अहमदनगर । वीरभूमी - 18-Jan, 2023, 03:26 PM
शासनाच्या आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्काराची (स्मार्ट ग्राम पुरस्कार) नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व कर्जत तालुक्यताील थेरगाव ग्रामपंचायतींना विभागून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केली आहे.
आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कारामध्ये (स्मार्ट ग्राम पुरस्कार) जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी कोपरगाव तालुक्यातील संवत्सरव कर्जत तालुक्यातील थेरगाव या गावांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दोन्ही गावांना विभागून देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 14 गावांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली असून ती गावे पुढील प्रमाणे- येळी (ता. पाथर्डी), वडुले बु. (ता. शेवगाव), बाभळेश्वर (ता. राहाता), खुपटी (ता. नेवासा), थेरगाव (ता. कर्जत), मांडवे खुर्द (ता. पारनेर), संवत्सर (ता. कोपरगाव), कोल्हेवाडी (ता. नगर), बेलापूर बु. व उंदीरगाव (ता. श्रीरामपूर) दपन्ही गावांना विभागून, तांदुळनेर (ता. राहुरी), मोहरी (ता. जामखेड), निमगाव खलू (ता. श्रीगोंदा), वीरगाव (ता. अकोले), वेल्हाळे (ता. संगमनेर) अशी आहेत.
या गावांना देण्यात येणार्या पुरस्काराचे स्वरुप हे प्रत्येकी 10 लाख रुपये व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुरस्कार प्राप्त गावांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
Comments