पाथर्डी । वीरभूमी - 21-Feb, 2023, 10:28 AM
शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे जोपासलेल्या ‘आनंदवन’ येथील वृक्षांना कायम स्वरुपी आवश्यक ते पाणी मिळण्यासाठी कासार पिंपळगाव येथील मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने ठिबक सिंचन बसविण्यात आले. या ठिबक सिंचनाने ‘आनंदवन’ येथील वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे.
ठिबक सिंचन संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील ‘आनंदवन’ या ठिकाणी राजीव स्मृति उद्यानाची उभारणी करण्यात आली.
येथे संदीप राठोड यांनी वृक्ष लागवडीचा महिमा जोपासलेला आहे. हे पुढे सुरु ठेवत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2022 रोजी शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व राजीव स्मृति उद्यान याची उभारणी झाली. या ठिकाणी वृक्षारोपणाने नवीन जंगल उभा करण्याची तयारी सुरू झाली. परंतु उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागल्याने त्या ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी पाणी टँकरची गरज भासू लागली.
मागीवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे येथे नुकतीच लागवड केलेली वृक्षसंपदा पाण्याअभावी जळून जाईल की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आ. मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीने ‘आनंदवन’ या ठिकाणी बोअरवेल घेण्यात येवून झाडांना पाणी देण्यास प्रारंभ झाला.
परंतु या उन्हाळ्यात झाडांना पाणी कमी पडू नये म्हणून ठिबक सिंचन योजना असेल तर कमी पाणीही झाडांना मुबलक प्रमाणात देता येईल. असा विचार समोर आला. उन्हाळ्यात निर्माण होणार असलेली पाणीटंचाई जाणवू नये म्हणुन कासार पिंपळगाव येथील मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने ‘आनंदवन’ या ठिकाणी ठिबक सिंचन संच बसविण्याचा निर्णय झाला.
या निर्णयानुसार शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्यावतीने ठिबक सिंचन संच बसविण्यात आला. याचे उद्घाटन जि. प. सदस्य राहुलदादा राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. ठिबक सिंचनमुळे ‘आनंदवन’ येथील वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे.
ठिबक सिंचन उद्घाटन प्रसंगी ग्रा.पं. सदस्य अंकुशदादा राजळे, ग्रा. पं. सदस्य आप्पासाहेब राजळे, प्रा. गंगाधर लवांडे, माजी सरपंच सचिन नेहुल, प्रा. काळोख, प्रविणकुमार तुपे, कांबळे सर, संदीप राठोड, रामेश्वर राजळे, रमेश भुसारी, अमित भगत, भिमराज राजळे, सुभाष शिंदे, गोविंद दगडखैर आदीसह मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
CwANhzgVWtnUBHJ