वडनेर । वीरभूमी - 02-Apr, 2023, 12:53 PM
पाऊस वेळी अवेळी पडणार आहे. मात्र शेतकर्यांनी घाबरून न जाता तुम्हाला सावध करण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निघोज ग्रामस्थ, शेतकरी बांधव तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच माऊली वरखडे, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, ज्ञानेश्वर लंके, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, उज्ज्वला अॅग्रोचे अध्यक्ष सचिन वरखडे, सागर पठारे, प्रगतीशील शेतकरी अर्जुन शिंदे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी विश्वस्त बबनराव तनपुरे आदींनी तसेच त्यांच्या सहकार्यांनी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना निघोज येथे आणीत व्याख्यान आयोजित करुण ग्रामस्थांना मार्गदर्शन केल्याबद्दल संयोजक, आयोजक व डख यांना उपस्थितांनी धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी निघोज ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने उपसरपंच माउली वरखडे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, आपली माती आपली माणसं या संस्थेच्या वतीने अध्यक्ष रुपेश ढवण, पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने भास्करराव कवाद, व्यापारी असोसिएशनच्या वतीने संदीप वरखडे यांनी ढख यांचा सत्कार केला.
डख यावेळी म्हणाले वनराईचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो म्हणून आपण झाडे जगवा झाडे वाढवा या नुसार वनराई वाढवीत होतो. आज मात्र उद्योग विश्व मोठ्या प्रमाणात आहे. काँक्रिट रस्ते, डांबरी रस्ते, सिमेंटच्या मोठ मोठ्या ईमारती यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाउसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाउस वाढला आहे. यासाठी झाडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असून जोराचा पाऊस पडण्याऐवजी कमी तिव्रतेने पाउस पडत आहे. दोन्ही दृष्टींनी झाडे महत्वाची आहेत. 1952 पासून प्रत्येक दहा वर्षे पुर्ण झाल्यावर दुष्काळ पडला होता.
1912 आणी 1922 ला दुष्काळ पडला नाही तो अंदाज आपणच सांगीतला होता. गेली तीस वर्षांपासून आपण पाउस पाणी याचा अंदाज वर्तवीत असून यासाठी दररोज असंख्य शेतकरी आपणाला भेटत असून या अंदाज माध्यमातून हजारो शेतकर्यांच्या नुकसानी टाळण्याचा प्रयत्न आपण केला असून यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत.
सोशल मिडिया माध्यमातून आपण लाखो शेतकर्यांपर्यंत पोहचलो असून आपण पाउसपाण्याचा व्यक्त केलेला अंदाज आजपर्यंत खरा ठरला असून यामाध्यमातून आपण लाखो शेतकर्यांना सावध करुण शेतीच्या नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला हे सर्वाधीक समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राज्यातून शेतकरी आपल्याला संपर्क साधीत असून शेती हे सर्वोत्तम प्रगतीचे माध्यम असून युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रगतीशील शेती करीत देशाचा विकास साधण्याचे आवाहन डख यांनी केले आहे.
ABfUVhMLneGW