अकोले । वीरभूमी - 06-Apr, 2023, 03:59 PM
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्व. अशोकराव भांगरे यांच्या रिक्त झालेल्या पदावर भांगरे कुटुंबातील सदस्यास संधी द्यावी, आम्ही आमचा उमेदवार त्यांच्या विरोधात उभा करणार नाही, असे सूतोवाच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केल्याने स्व. अशोकराव भांगरे यांच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी स्व.अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली.
यावेळी ज्येष्ठ संचालक मिनानाथ पांडे यांनी सुनिताताई भांगरे यांच्या नावाची सूचना मांडली तर त्यास जेष्ठ संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.भालेराव साहेब, प्रादेशिक सह संचालक (साखर) अहमदनगर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर आ.डॉ.किरण लहामटे आणि चेअरमन सिताराम पा.गायकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सहकारी साखर कारखाण्याच्या उपाध्यक्षपदी सुनीताताई भांगरे यांना अहमदनगर जिल्ह्यात व अकोले तालुक्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, चेअरमन सिताराम पा. गायकर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, मधुकरराव नवले, सर्व संचालक, विजयराव वाकचौरे, सुरेश नवले, शांताराम संगारे, तुकाराम गोर्डे, योगेश नाईकवाडी, राजेंद्र गवांदे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, केन मॅनेजर सयाजी पोखरकर, विश्वास ढगे, सतीश देशमुख, रमेश पुंडे, उल्हास देशमुख, कोंडीबा पवार, श्री. सहाणे आदीसह भांगरे समर्थक उपस्थित होते.
यावेळी अमित भांगरे म्हणाले की, आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती सहकारी साखर कारखाण्याचे सर्व ज्येष्ठ संचालक, नेते यांनी बैठक घेऊन सुनिताताई भांगरे यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सूनिताताई यांना विनंती करतो की, राजकारण हे समाजकारणातून केले जाते मात्र सहकार क्षेत्रातील हे पद काटेरी मुकुट आहे.
अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीत आहे. आदिवासी भागात ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही तीनही संचालक अगस्तीला मदत करण्यासाठी प्रयत्न करू. अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. सुनिताताई भांगरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सुनीताताई भांगरे यांची व्हा. चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
lTqNhUXVrKp