शेवगाव । वीरभूमी - 09-Apr, 2023, 01:36 PM
सामाजिक कार्य करत असताना कुठलाही राजकीय हेतू मनामध्ये न ठेवता आपण जनतेची सेवा करत आहोत. जनतेची अविरत निःस्वार्थ सेवा करत आहे म्हणूनच हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मला मिळालेला पुरस्कार मी आई महालक्ष्मी देवीच्या व जनतेच्या चरणी अर्पण करते, असे प्रतिपादन मा. जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात मासिक उत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमेनिमित्त महाआरतीचे आयोजन व जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सौ. काकडे बोलत होत्या.
सौ. काकडे म्हणाल्या की, श्री महालक्ष्मी देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याबद्दल प्रयत्न करून या देवस्थानाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन दरबारी प्रश्न मांडून सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी देवस्थानचे सचिव अशोक ढाकणे म्हणाले की, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड या संस्थानातील सरदार शहाजीराव नाईक यांनी निर्माण केलेल्या पूर्वाश्रमीच्या लक्ष्मीपुरी व सध्याच्या लखमापूरी या गावांमध्ये उपलब्ध इतिहासानुसार 500 वर्षापासून प्रतिदिन नित्य श्री. महालक्ष्मी मंदिरामध्ये पूजा होते. गावामध्ये गेल्या वर्षापासून प्रति पौर्णिमेला महाआरती व महाप्रसादाची पंगत लोकसहभागातुन करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे, जनशक्ती युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पातकळ, वि.का.से.सो.चेअरमन बापूराव गाडे, व्हा.चेअरमन माणिकराव शेळके. ग्रा.पं.सदस्य संदीप हिंगे, शरद जोशी, सुधाकर सांगळे, रामेश्वर अंबाडे, सुभाष गावंडे, बाळासाहेब कवडे, राम वाबळे, भरत सरोदे, दीपक सोनवणे, विजय मातंग, दत्तात्रय जराड, राजेंद्र मंचरे, कृष्णा सरोदे, कृष्णा निर्मळ, विष्णू जराड, रामेश्वर निर्मळ, विष्णू डोंगरे, काकासाहेब अंबाडे, छाया जर्हाड, हिराबाई पवार, संगीता मंचरे, प्रियांका निर्मळ, नंदा सोनवणे, निर्मला ढाकणे, सरला निर्मळ, सुवर्णा अंबाडे, वनिता गावंडे, वैशाली पवार, सरस्वती हिंगे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments