दगडफेकीच्या निषेधार्थ आज शेवगाव, पाथर्डीत बंद
अटक केलेल्या या 31 आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी । इतरांचा शोध सुरु
शेवगाव । वीरभूमी- 16-May, 2023, 09:53 AM
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेप्रकरणी शेवगाव पोलिसांनी तब्बल 112 व इतर 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले असून 31 जणांना अटक केली आहे. या घटनेतील इतर आरोपींना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांनी आज बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाथर्डी शहरातही आज बंद पाळण्यात येणार आहे.
शेवगावात खबरदारीचा उपाय म्हणुन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेतील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवून नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान दोन गटात दगडफेकीची घटना होवून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तब्बल 112 व इतर 100 ते 150 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून 31 जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोकॉ. महेश लक्ष्मण सावंत यांच्या फिर्यादीवरुन इमरान दिलावर पठाण (वय 22, रा. नाईकवाडी मोहल्ला), इम्रान मुस्तफा पठाण (वय 27, रा. नाईकवाडी मोहल्ला), बंडु मधुकर वाबळे (वय 32, रा. वाबळे वस्ती), राहुल नवनाथ कुसळकर (वय 29,रा. वडारगल्ली), मुस्तफा मन्सुरखान पठाण (वय 48, रा.नाईवाडी मोहल्ला), इम्तीयाज ईस्माईल शेख (वय 31, रा. नाईवाडी मोहल्ला), नईम इलीयास सय्यद (वय 34, रा. नाईवाडी मोहल्ला), अमर मुस्तफा शेख (वय 26, रा. भगुर), सल्लाउद्दीन हशमोद्दीन शेख (वय 31, रा. नाईकवाडी मोहल्ला), रिजवान आयुब शेख (वय 28, रा. नाईवाडी मोहल्ला).
वसिम अल्ताफ शेख (वय 31, रा. नाईकवाडी मोहल्ला), सोमनाथ सतिष मोहीते (वय 28), यासीर इस्माईल शेख (वय 28, रा. गेवराई रोड, शेवगाव), मतीन युसुफ शेख (वय 42, रा. नाईवाडी मोहल्ला), शब्बीर युसुफ जाहाँगीरदार (वय 34, रा. नाईवाडी मोहल्ला), जावेद चाँद शेख (वय 29, रा. गेवराई रोड, शेवगाव), अर्शद अहमद शेख (वय 20, रा. सोनामियाँ वस्ती, शेवगाव), बापुसाहेब चंद्रकांत वाघ (वय 25, रा. इंदिरानगर), बाबासाहेब दादु वाघमारे (वय 39, रा. इंदिरानगर, शेवगाव), प्यारेलाल दस्तगीर शेख (वय 59, रा. विद्यागनर).
सलीम फैय्याज शेख (वय 28, रा. नाईकवाडी मोहल्ला), फिरदोस फारूक पठाण (वय 25, रा. नाईवाडी मोहल्ला), शमशोद्दीन कदीर सय्यद (वय 34, रा. शास्त्रीनगर), नदीम जाफर शेख (वय 27, रा. नाईवाडी मोहल्ला), रज्जाक कदीर सय्यद (वय 19, रा. शास्त्रीनगर), हुसेन रहीम बेग (वय 30, रा. इंदिरानगर, शेवगाव), रोहीत अशोक सुपारे (वय 19, रा. वडारगल्ली), कैलास भाऊराव तिजोरे (वय 46, रा. पैठण रोड, शेवगाव), आरिज नजीर पठाण (वय 29, रा. नाईकवाडी मोहल्ला) यांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेदरम्यान दुसर्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आ. मोनिकाताई राजळे यांनी भेटी देवून घटनेचा आढावा घेतला. दरम्यान नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर शेवगाव तहसील कार्यालयात शासकीय अधिकार्यांची बैठक घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकार्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी शेवगाव शहरात बंद पाळण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला आहे. यावेळी व्यापार्यांच्यावतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून या घटनेतील इतर आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील व्यापार्यांनीही बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस प्रशासन लक्ष्य ठेवून आहे. तसेच इतर आरोपींचा शोध घेवून अटक करण्यासाठी विविध पथके रवाना झाली आहेत.
srpxZNcROz