112 जणांवर गुन्हे दाखल । 32 जण ताब्यात
शेवगाव । वीरभूमी- 15-May, 2023, 09:24 AM
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शेवगाव शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान घडली. मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ उडाली होती.
दोन गटात एकमेकांवर दगड फिरकवल्याने अनेक जण जखमी झाले. तर परिसरातील काही दुकांच्या काचा फुटल्या. तसेच घटनास्थळी असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दगडफेकीच्या घटनेनंतर शेवगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थितीतवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावण्यात आला होता. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात 112 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 32 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून ताब्यातील व्यक्तींची सहभागाबद्दल पडताळणी केली जात आहे.
परिस्थितीवर उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोनि. विलास पुजारी लक्ष ठेवून आहेत. दगडफेकीच्या घटनेदरम्यान घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेतील दोषींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान शेवगाव शहरात सध्या शांतता असून काही ठिकाणी जाळपोळ झाल्याची माहिती समोर येत आहे.
ZVAhidOEjLlS