शेवगाव । प्रतिनिधी- 18-May, 2023, 10:35 PM
तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांचा साखर कारखाना म्हणुन प्रसिद्ध असलेल्या संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत 19 जागेसाठी गुरुवार अखेर 25 जणांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल करण्याचा शुक्रवार दि. 19 मे अखेरचा दिवस आहे.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवार दि. 15 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवार दि. 19 उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
गुरुवार अखेर 26 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी बोधेगाव गटातून प्रकाश गंगाधर घनवट, बाळू ज्ञानोबा फुंदे, बाळासाहेब अंबादास खेडकर. हातगाव गटातून विठ्ठल भाऊराव अभंग, भाऊसाहेब दादासाहेब मुंढे, सुरेशचंद्र विश्वासराव होळकर, अशोक निवृत्ती तानवडे.
मुंगी गटातून बापुराव भानुदास घोडके, श्रीमंत रंगनाथ गव्हाणे, रणजित पांडुरंग घुगे. चापडगाव गटातून उत्तम सीताराम आंधळे, पांडुरंग हरिभाऊ काकडे, शिवाजी विश्वनाथ जाधव, सदाशिव हरिभाऊ दराडे.
हसनापूर गटातून ऋषिकेश प्रताप ढाकणे (दोन अर्ज), माधव भिवसेन काटे. उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी- प्रताप बबनराव ढाकणे.
महिला प्रतिनिधी- मिनाताई संदीप बोडखे, सुमनबाई मोहन दहिफळे. भ. वि. जाती/जमाती वि.मा. प्रवर्ग- त्रिंबक दत्तू चेमटे, उत्तम रघुनाथ ढाकणे.
अनुसुचित जाती/जमाती प्रतिनिधी - सुभाष कचरु खंडागळे, सुखदेव माधव खंडागळे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी- तुषार शिवनाथ वैद्य, अशोक निवृत्ती तानवडे असे 25 जणांनी 26 अर्ज दाखल केले आहेत.
कारखाना संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी निवडणूक होत असून सत्ताधारी ढाकणे गटाने आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर विरोधी भाजपा गट अद्यापही शांततेच्या भूमिकेत दिसत आहे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे डॉ. पी. एन. खंडागळे हे काम पहात असून त्यांना गहिनीनाथ विखे हे सहाय्य करत आहेत.
gdNtEjsGIiQuk