अकोले । वीरभूमी- 10-Jun, 2023, 06:20 PM
झी समूहाच्या किड झी (kidzee) माध्यमातून अकोले शहरात शिवाजी नगर येथे वयोगट 2 ते 6 वर्षाच्या लहान मुलांसाठी kidzee प्रि स्कुल सुरू होत असून त्याचे उदघाटन रविवार दि.11जून रोजी सांयकाळी 4.30 वाजता सिने अभिनेते संतोषजी जुवेकर, लोकप्रीय आमदार सत्यजीत दादा तांबे (विधान परिषद सदस्य ), अगस्ति सह.कारखान्याचे चेअरमन सिताराम पा.गायकर व नगराध्यक्ष सौ. सोनालीताई नाईकवाडी यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती संचालिका सौ.मोनलिताई सतीश चोथवे व ऋषीकेश सुरेश वराडे यांनी दिली.
चोथवे व वराडे परिवार उद्योग व्यवसायातून आता शिक्षण क्षेत्रात पदार्पण करीत असून लहान मुलांचा शास्त्रीय, मानसिक दृष्ट्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रि स्कुल अकोले शहरात सुरू करीत असल्याचे ऋषीकेश सुरेश वराडे व सौ.मोनलिताई चोथवे म्हणाल्या. ते पुढे म्हणाले की kidzee च्या भारतभर 2000 च्या वर प्रि स्कुल आहेत.
आशिया खंडात सर्वात मोठे प्रि स्कुल नेटवर्क आहे.झी टीव्ही वाहिनीचे हे प्रि-स्कुल आहे.त्याची एक शाखा अकोले शहरातील शिवाजी नगर येथे रम्य अशा वातावरणात सुरु होत आहे.परिसरात रंगरंगोटी केल्यामुळे येथे लहान मुले हसत खेळत, जीवनाचा आनंद घेत, चार भिंतीच्या पलीकडील प्रॅक्टिकली शिक्षण घेणार असून त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. लहान वयात त्यांच्या मेंदूवर चांगले संस्कार झाले तर ते मानसिक, शारीरिक, बौद्धिक दृष्टीने सक्षम होऊन जगाच्या स्पर्धेसाठी तयार होणार आहेत.
त्यादृष्टीने पेंटा माईंड हा युनिक प्रोग्राम आहे.त्यामध्ये फोकस माईंड,अनिलिटिकल माईंड,कॉन्ससेशन माईंड,इम्पॅथेटिक माईंड आणि ईनेव्हीटेव्ह माईंड अशा पाच माइन्ड्सवर भर देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.
प्रि- स्कुल मध्ये प्ले ग्रुप,नर्सरी,ज्युनियर केजी व सिनियर केजी असे चार वर्षे विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. या मध्ये विशेष करून वातावरणातील बदल व त्याचे होणारे परिणाम याबाबत शिक्षण दिले जाणार असून शेती विषयावर प्रॅक्टीकली भर दिला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तरी पालकांनी या प्रि- स्कुल ला भेट देऊन माहिती घेऊन देशाचे भवितव्य असणाऱ्या आपल्या बालकांना या प्रि स्कुल मध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा व उदघाटन प्रसंगी सर्वानी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन ऋषीकेश सुरेश वराडे व सौ.मोनालीताई सतीश चोथवे यांनी केले.
vHbfaXAQynuK