पाथर्डी । वीरभूमी - 12-Jun, 2023, 01:47 PM
धर्मनिरपेक्ष विचारधारेचा वारसा जोपासून राज्यात सर्वधर्मसमभाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र आज प्रगतिपथावर नेत सर्वांचे उज्ज्वल भवितव्य घडविणारे नेते शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून राष्ट्रवादीच उद्याचा महाराष्ट्र घडवु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणिस अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पाथर्डीत सकाळी पक्ष कार्यालय येथे झेंडावंदन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्व. वसंतराव नाईक पुतळ्यास अभिवादन त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून क्रिकेट स्पर्धा शुभारंभ असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष शिंवशंकर राजळे, बंडु पा. बोरूडे, महारूद्र किर्तने, गहिनीनाथ शिरसाट, डॉ.राजेंद्र खेडकर, ज्ञानदेव केळगंद्रे, योगेश रासने, बन्सी आठरे, राजेंद्र बोरूडे, सविता भापकर, रत्नमाला उदमले, ज्योती जेधे, वैभव दहिफळे, देवा पवार, आजिनाथ खेडकर, ज्ञानदेव खेडकर, सिताराम बोरूडे आदी उपस्थित होते.
अॅड. ढाकणे म्हणाले, स्वाभिमानी विचारातून जनसामान्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी 25 वर्षापुर्वी केली. त्यापुर्वी पवारांनी पुरोगामी विचारसरणी अमलात आणत राज्यातील प्रत्येक घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत काम केले. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वसा जोपासून पवार साहेब यांनी समाजकारणात आपले योगदान देत आहेत.
आज जातीय राजकारण व इतर अनावश्यक बाबींनी धुमाकुळ घातला आहे. तो लोकशाहीला घातक असुन त्यास रोखण्यासाठी सर्वसमावेशक विचारधारा जोपसेने गरजेची असून त्यासाठी जनतेने शरद पवारांना व त्यांच्या विचारसरणीला साथ द्यावी असे आवाहन ढाकणे यांनी केले.
caSFHXhzbAr