श्रीगोंदा । वीरभूमी - 12-Jun, 2023, 02:01 PM
नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली या गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या तरुणाचा गावातील गावगुंडांनी खुन केल्याच्या निषेधार्थ योग्य ती कारवाई करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शहराध्यक्ष युवराज घोडके व कार्यकर्त्यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की दि. 1 जून 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव या तरुणाने गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा मनात राग धरुन गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव याची निर्घृण हत्या केली. या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सीबीआय व सीआयडी विभागाची नेमणूक करावी.
तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषी आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी. हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तातडीने पिडीत कुटुंबाला राज्य सरकारने 50 लाखाची मदत करावी व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी श्रीगोंदा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शहराध्यक्ष युवराज घोडके, राजू काळेवाघ, आनंद शिंदे, जॉन घोडके, चेतन ससाने, संदीप ससाने, अक्षय जाधव, गोरख घोडके, संदीप उमाप, अमर घोडके, मीराताई शिंदे, शिवा घोडके, संजय सावंत, नाना शिंदे, अजीम जकाते, समीर शिंदे, बापू माने, अक्षय आठवले, मौलाना आलिमसाब व विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
qwbSKzCelrZy