वारकर्यांच्या सोयी-सुविधेबाबत स्थानिक अधिकार्यांना दिल्या सूचना
मिरजगाव । वीरभूमी - 13-Jun, 2023, 12:38 PM
आषाढी एकादशी निमित्त श्री.क्षेत्र पंढरपूरकडे जाणार्या पायी दिंडी वारीतील वारकर्यांना पुण्याच्या धर्तीवर सुविधा मिळावी. यासाठी नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर येथे जिल्हाभरातील दिंड्यांचे प्रमुख व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली असता, त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मिरजगाव येथे पायी दिंडी वारी मुक्कामी ठिकाण जिल्हा प्राथमिक शाळा मिरजगाव तसेच नगर-सोलापूर हायवेने मिरजगाव पोलिस स्टेशन हद्दीतून जाणार्या दिंडी मार्गाची रविवार दि.11 रोजी पाहणी केली. व येथील परिस्थिती बाबतचा आढावा घेतला. यावेळी पंढरपूर येथे पायी दिंडीने जाणार्या भाविकांसाठी आरोग्य सोयी-सुविधा पुरविणे.
तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील मंगल कार्यालय दिंडीतील नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे बाबत गटविकास अधिकारी यांना तसेच पायी दिंडीने जाणार्या मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेकरिता व ट्रॉफिक वळविण्याकरिता मिरजगाव पोलिसांना बंदोबस्त देण्याबाबत सूचना दिल्या असुन तेथील अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जतचे तहसीलदार जगदाळे, पीडब्लू व नॅशनल हायवेचे अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष दराडे, शंकर बचाटे, मंडळाधिकारी केदार, तसेच सरपंच नितीन खेतमाळस स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
लाखो भाविक वारकरी वर्षानुवर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. प्रशासनाची मदत मिळो अथवा ना मिळो दिंडी सुरूच राहणार आहे. मात्र शासन आणि प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून आषाढीला जाणार्या प्रत्येक दिंडीला मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, व्यवस्थेचे नियोजन अहमदनगर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आवश्यकती मदत आणि संपर्क करण्यासाठी प्रशासनाने पंढरीची वारी शासन आपल्या दारी वॉर रुम तयार केली आहे. वारकर्यांची वारी सुखरूप व्हावी या भावनेतून पुण्यातील दिंडीच्या धर्तीवर हे नियोजन यंदा प्रथमच जिल्ह्यातून जाणार्या शेकडो पायी दिंडी करिता करण्यात आले आहे.
Comments