शिवार हिरवे होईपर्यंत माझा पाठपुरावा राहणार
स्नेहलताताई कोल्हे । निळवंडे कालव्यांचे जलपुजन
कोपरगाव । वीरभूमी - 13-Jun, 2023, 12:59 PM
निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन कालव्यांच्या माध्यमातून धरणातून लाभक्षेत्रातील निळवंडे कालवे दू तरफा भरून वाहू लागले आहेत. या क्षणाचे साक्षीदार होऊन लाभ क्षेत्रातील भागात जलपूजन माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना सौ. कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी कोपरगाव मतदार संघातील अकरा गावांचा निळवंडे लाभक्षेत्रात समावेश व्हावा. यासाठी त्याकाळी आग्रह धरला ज्यामुळे आज सोन्याचे दिवस या भागाला प्राप्त होणार आहे. या क्षणी साहेब असायला हवे होते. त्यांना अतिशय आनंद झाला असता.
कालवे जरी वाहू लागले असेल तरी कालव्यांचे वाहते पाणी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या शिवारापर्यंत जाण्यासाठी पोट चार्या व बंधारे भरून घेण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असून आगामी काळात तुमच्या शेतातील पीक हिरवी होत नाहीत तोपर्यंत मी तुमच्या सहकार्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे असे सौ.कोल्हे म्हणाल्या.सर्व शेतकरी बांधवांच्याही अनेक वर्षाच्या लढ्याला यश आले त्याबद्दल अभिनंदन केले व भाजपा शिवसेना सरकारने जो भरीव निधी दिला त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.
अनेक दशकांचा सुरू असलेला हा संघर्ष कोल्हे कुटुंबाला कधीच विसरता येणार नाही कारण निळवंडेसाठी निर्मळ पिंपरी येथे आंदोलन होणार होते त्या पूर्वी एक दिवस अगोदर बिपीनदादा कोल्हे यांच्या यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती तरीही तो दिवस टाळून निळवंडे लाभ क्षेत्रासाठी होणार्या आंदोलनात ते आग्रहाने सहभागी झाले व त्यानंतर स्वतःवर उपचार केले. अशा भावनिक नाळ जोडलेल्या प्रश्नाला सोडवण्यासाठी मी आवश्यक तिथे संघर्ष केला व प्रश्नाचा पाठपुरावा सोडला नाही त्यामुळे माझं भावनिक नातं निळवंडे पाण्यासाठी आहे.
मी विधानसभेत गेल्यानंतर नागपूर अधिवेशनाला पायर्यांवर बसून स्व सरकारच्या विरोधात आंदोलन केले व निळवंडे धरणासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी सरकार दरबारी भांडत राहिले कारण स्व. कोल्हे साहेब यांनी कोपरगाव मतदरसंघांतील लाभक्षेत्रातील गावांचा समावेश होण्यासाठी केलेली आंदोलने आणि पाठपुरावा हा माझी प्रेरणा ठरला. कोणत्याही श्रेय वादात न अडकता मला प्रश्न सुटल्याचे समाधान लाखमोलचे आहे.
या पुढील काळातही आपण हाक द्याल त्या-त्या प्रश्नांसाठी तुमच्या समवेत सर्व स्तरावर येऊन संघर्ष करण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हे कुटुंब तुमच्या सदैव सोबत असेल कारण तिजोरीतील संपत्तीपेक्षा जोडलेल्या माणसांची संपत्ती ही सर्वात मोठी मानणारे कोल्हे कुटुंब आहे असे मनोगत याप्रसंगी सौ.कोल्हे यांनी व्यक्त केले.
या वेळी विक्रम पाचोरे, कैलास रहाणे, नानासाहेब गव्हाणे, धनंजय वर्पे आदी लाभार्थी शेतकर्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी साईनाथ रोहमारे,विश्वास महाले, अरुणराव येवले, व्हा. चेअमन रमेशराव घोडेराव, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, सर्जेराव औताडे, बापूसाहेब बारहाते, कैलासराव रहाणे, प्रकाश गोर्डे, नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब गोर्डे, माधुरीताई डांगे, वैशालीताई साळुंखे, शरदनाना थोरात, विक्रम पाचोरे, रमेश आभाळे, बापूसाहेब औताडे, त्र्यंबक वर्पे, धनंजय वर्पे, विजयराव डांगे, दत्तात्रय गुंजाळ, चंद्रभान गुंजाळ, बाबासाहेब नेहे, एकनाथ दरेकर, सुरमान सय्यद, वाल्मीक कांडेकर, रमेश रहाने, आप्पासाहेब रहाणे, दिगंबर कांडेकर, राजेंद्र कोल्हे, सुरेश पाडेकर, कानिफ गुंजाळ, ज्ञानदेव थोरात, संजय सरवार, प्रल्हाद गाडे, नवनाथ आरणे, अण्णासाहेब गांगवे, साहेबराव पाचोरे, अनिल शिंदे, नितीन पाचोरे, सुनील कांडेकर आदींसह निळवंडे लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments