लतिफ राजे । वीरभूमी - 07-Nov, 2023, 04:34 PM
पारनेर : पारनेर तालुक्यात काल मतदान झालेल्या कान्हूरपठार, जामगाव, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, विरोली व काकणेवाडी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडूकीत आ. निलेश लंके यांच्या गटाची निवडणुकीत सरशी झालेली दिसून आली आहे. निवडणूक झालेल्या सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर लंके समर्थकांनी बाजी मारली असून जामगांव ग्रामपंचायतची सत्ता मनसेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब माळी यांनी बिनविरोध मिळविली आहे.
वाडेगव्हाण व कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल मात्र धक्दाकायक लागला असून चाळीस वर्षानंतर तिथे सत्तांतर झाले आहे. माजी सभापती गणेश शेळके यांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला असून त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाल्या आहेत.
कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉ. आझाद ठुबे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तिथे कान्हूरपठारच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. वाडेव्हाणमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांच्या गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कान्हूरपठार मध्ये संध्या किरण ठुबे 1945 मते (विजयी), रेश्मा सागर व्यवहारे 1,813 पराभूत, शुभांगी बाळसाहेब गुमटकर 75 पराभूत, सविता भास्कर ठुबे 84 पराभूत, नोटा 20.
वाडेगव्हाणमध्ये प्रियंका किशोर यादव मते 1498 (विजयी) अनिल पवार 94 पराभूत, नंदिनी रामचंद्र शेळके 595 पराभूत, नोटा 10. मावळेवाडीमध्ये कल्याणी कांतीलाल भोसले 400 (विजयी), माधुरी रमेश कुरकुटे 6 पराभूत, नंदा नारायण पठारे 2 पराभूत, रविना सुरेश पठारे 313 पराभूत, नोटा 1. यादववाडीमध्ये राजेंद्र बाळू शेळके 393 (विजयी), अरविंद नामदेव यादव 348 पराभूत, संतोष तुकाराम यादव 12 पराभूत, जालिंदर एकनाथ शेळके 372 पराभूत, नोटा 3,
काकणेवाडीमध्ये अशोक पाराजी वाळुंज 615 (विजयी), जयवंत तुकाराम वाळुंज 489 पराभूत, राहुल पोपट पवार 3 पराभूत, 5 नोटा. वाडेगव्हाण, कान्हूर पठारमध्ये परिवर्तन कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तब्बल 40 वर्षांनंतर सत्तांतर झाले असून कॉ. आझाद ठुबे यांच्या पॅनलला तिथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. ठुबे गटाचे 7 तर राष्ट्रवादी काँग्रसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवार संध्या किरण ठुबे या विजयी झाल्या. मा. आ. स्व. बाबासाहेब ठुबे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी स्व. विष्णूपंत व्यवहारे यांच्याकडून ग्रामपंचायतीची सत्ता हिराउन घेतली होती. स्व. ठुबे यांच्या पश्चातही ठुबे गटाच्याच ताब्यात ग्रामपंचातीची सत्ता होती.
तसेच माजी सभापती गणेश शेळके यांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला असून त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवार मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. मतमोजणी नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला.
Comments