पाथर्डी । वीरभूमी - 09-Nov, 2023, 12:41 PM
महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे पाथर्डी तालुक्याच्या दौर्यावर आले असता त्यांचे तालुका काँग्रेसच्यावतीने शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या प्रा. जालिंदर काटे, सुभाषराव भाबड, वसंतराव खेडकर, अमोल गाडे, सूर्यभान गर्जे, नवाबभाई शेख यांचा सन्मान माजीमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी थोरात यांनी तालुक्यातील पक्ष कार्याचा आढावा घेत पदाधिकार्यांशी मनमोकळा संवाद साधला. तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व पालिका निवडणुकी विषयी माहिती घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख, उपाध्यक्ष रवींद्र पालवे, पोपटराव बडे, सुभाष कोलते, सेवादल अध्यक्ष किशोर डांगे, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ढाकणे, गणेश दिनकर, संजय कराड, माऊली खेडकर, सुनील दौंड, शरद पवार, आकाश काळोखे, डॉ. जमशेद सय्यद, इजाज पठाण, शिवाजी नन्नवरे, प्रशांत मगर, रोहिदास खेडकर, असलम सय्यद, युसूफ खान, मुन्नाभाई खलिफा,
कय्युम् शेख, दत्ता मोरे, जब्बार आतार, भारत देवढे, शंकरराव जगताप, भाऊसाहेब गोसावी, वसंतराव पठाडे, ज्ञानदेव भाबड, भारत चितळे, डॉ. सुखदेव भाबड, सुशांत बुधवंत, ढोले पाटील, वसंत खेडकर, अब्दुल अजीज शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments