शेवगाव । वीरभूमी - 23-Dec, 2023, 08:38 AM
ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम जून अखेर पूर्ण होणार असून योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून शंभर कोटी पेक्षा जास्त रकमेची तरतूद केली. चालू अर्थसंकल्पामध्ये 36 कोटी रुपयांची तरतूद झाली असून उर्वरित कामासाठी 34 कोटी रुपयांची पुरवणी अर्थसंकल्पात मागणी केली असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला संजीवनी ठरणार्या ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा 2 चे दोन वितरण कुंडातून यशस्वी पाणी चाचणी घेण्यात आली. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे शेतकर्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून तत्पूर्वी सदर वितरण कुंडातील पाणी कुंडा जवळील सोनेसांगवी, चापडगाव, प्रभूवाडगाव, गदेवाडी, खामपिंपरी आदी गावातील बंधार्यात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बापूसाहेब पाटेकर, सरचिटणीस भीमरावजी सागडे, उपसरपंच सुरेशराव नेमाने, बंडू गायकवाड, केशव आंधळे, सत्यनारायण मुंदडा, हभप. झुंबड महाराज, कृष्णा नेमाने, राजाराम गायकवाड, साईनाथ गायकवाड, शिवाजी गोरे, सावता गायकवाड, नारायण मडके, सोमनाथ मडके, रावसाहेब लवांडे, भगवान तेलोरे, राजाराम तेलोरे, हरिभाऊ झुंबर मामा, कृष्णा झुंबड, एकनाथ खोसे, गणेश थोरात, जगन्नाथ भागवत, मधुकर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ताजनापुर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, प्रकाश थोरात, उपकार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी, प्रवीण कांबळे, शाखा अभियंता महेश चौरे व सदर कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, योजनेचे काही कालावधीत संत गतीने काम चालू होते. परंतु सध्या शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे तसेच योजनेवर काम करणारे अधिकारी वर्ग, कर्मचारी व संबंधित ठेकेदार तत्परतेने काम करत असल्याने येत्या सहा सात महिन्यात योजनेचे काम पूर्ण होईल. काम करत असताना श्रेय घेणे हा उद्देश न ठेवता जनकल्याणासाठी काम करणे हा उद्देश समोर असतो.
शेवगाव तालुक्यातील खानापूर, अंतरवाली, घोटण, बाबुळगाव, राक्षी, कुरडगाव, रावतळे, मळेगाव, गदेवाडी, ठाकूर निमगाव, सोनेसांगवी, कोळगाव, हसनापूर, वरखेड, चापडगाव, दहिगाव शे, मंगरुळ खुर्द व बुद्रुक, अंतरवाली बु. या गावातील सुमारे 6960 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
शेजारील इतरही गावांची योजनेत समावेश करण्यासाठी मागणी असून सदर योजना यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर उर्वरित गावांचाही समावेश करणेबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
OgFYXlVZuwKGc