पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेच्या विकास कामासाठी 8 कोटींचा निधी मंजूर
आमदार मोनिका राजळे यांची माहिती । अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार, सभामंडप, अमरधामची कामे मार्गी लागणार
पाथर्डी । वीरभूमी - 08-Sep, 2024, 06:14 PM
पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून 8 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय झाला. या निधीतून पाथर्डी व शेवगाव नगरपरिषद अंतर्गत रस्ते, कॉक्रीटीकरण, पेव्हींग ब्लॉक रस्ते, अमरधामची कामे, भूमिगत गटार योजना, ओपनस्पेस विकसीत करणे, सभामंडप बांधणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.
या शासन निर्णयात पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत वामनाभाऊनगर मधील कारभारी कुरुंद ते विजय पवार घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे ः 15 लाख रुपये, प्रभाग क्र. 4 मधील नवनाथ आंधळे घर ते शेवगाव रोड रस्ता कॉक्रीटीकरण करणे ः 15 लाख रुपये, अॅड. पालवे घर ते सुनिल उगले घर रस्ता कॉक्रीटीकरण करणेः 15 लाख रुपये, दुलेचांदगांव रस्ता ते बालवे वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, कदम यांच्या घरापासून ज्ञानेश्वर शिरसाट यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे 15 लाख रुपये.
प्रभाग क्र. 7 मधील रंगारगल्ली येथील ज्येष्ठ नागरीक संघ इमारतीची वरच्या मजल्याचे बांधकाम करणे 15 लाख रुपये, काळे वस्ती ते भापकर वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, किशोर खोर्दे घर ते रामभाऊ भापकर घर रस्ता खडीकरण व कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, प्रभाग क्र. 2 मधील तनपुरवाडी येथील स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे 15 लाख रुपये, माणिकदौडी रोडवरील सपकाळ वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये. प्रभाग क्र. 1 मधील शेवगाव रोड ते भारत परदेशी घर रस्ता खडीकरण करणे 15 लाख रुपये.
साईनाथनगर मधील माणिकदौंडी रस्ता ते अर्बन बँक रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, इधाटे ओपन स्पेस ते विजय गर्जे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, प्रभाग क्र. 4 मधील मोहटादेवी हॉस्पीटल ते शेवगांव रोड रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, खंडोबामाळ येथील गायकवाड घर ते लिंगे घर बंदीस्त गटार व रस्त्याचे काम करणे 15 लाख रुपये, महादेव बोरुडे घर ते नदीपर्यंत खडीकरण काँक्रीटीकरण व भूमिगत गटार करणे 15 लाख रुपये, साईनाथनगर मधील साईनाथ मंदिर ते शेटे सर घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये.
गायकवाड सर यांचे घर ते माणिकदौंडी रस्ता व गायकवाड सर यांचे घर ते दानापुरे बिल्डींग रस्ता कॉक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, दुध शितकरण केंद्र ते हंडाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख रुपये, सावता महाराज ओपन स्पेस येथे सभामंडप बांधणे व सुशोभीकरण करणे 20 लाख रुपये, माणिकदौंडी रोड शर्मा दुकान ते डोईफोडे गुरुजी यांचे घर बंदीस्त गटार व सिडीवर्क करणे 20 लाख रुपये, बालवे वस्ती ते साखरे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे 30 लाख रुपये.
तसेच शेवगाव नगरपरिषद अंतर्गत हिंदु स्मशानभुमी सुशोभिकरण करणे 30 लाख रुपये, वडार समाज स्मशानभुमी वॉलकंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे 30 लाख रुपये, शनिमारूती मंदिर शेजारी सभामंडप बांधणे व सुशोभिकरण करणे 60 लाख रुपये, नगर रोड ते बबन म्हस्के निवास रस्ता काँक्रीटीकरण करणे, अंतर 200 मी. 20 लाख रुपये, खंडोबा प्राथमिक शाळा, खंडोबानगर सुशोभिकरण करणे 10 लाख रुपये, प्राथमिक शाळा (मुलींची), जुना कोर्ट, सुशोभिकरण करणे 7.50 लाख रुपये, खालची वेस प्राथमिक शाळा समोरील ओपन स्पेस सुशोभिकरण करणे 7.50 लाख रुपये, गहिलेवस्ती प्राथमिक शाळा सुशोभिकरण करणे 5 लाख रुपये, सर्जेवस्ती प्राथमिक शाळा सुशोभिकरण करणे 5 लाख रुपये.
दादाजी वैश्यपायननगर येथे मा. आमदार स्व. राजीव राजळे सामाजिक सभागृह बांधणे व परिसर सुशोभिकरण करणे 30 लाख रुपये, पैठण रोड ते गणेश सुरवसे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख रुपये, नाथनगर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ते श्री. विष्णु घनवट यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख रुपये, मिरी रोड ते साबळे गुरूजी निवास 200 मी. रस्ता काँक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, महाराणा प्रताप चौक, लांडेवस्ती रोड ते संजय गवळी निवास पेव्हर ब्लॉक करणे, बंदिस्त गटार करणे अंतर 150 मी. 15 लाख रुपये.
हॉटेल लकी पासुन विकास भगवान मुरदारे वस्ती मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख रुपये, प्रफुल्ल राऊत यांचे घर ते श्री. वावरे सर यांचे घर नगरपरिषद शेवगांव अंतर्गत ते श्री. ज्ञानेश्वर काकडे यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे 15 लाख रुपये, पाथर्डी रोड ते अजिंक्यनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, काळे गिरणी ते पावसे घर रस्ता डांबरीकरण करणे 30 लाख रुपये.
अमोल जोशी यांचे घर ते डॉ. भिसे यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे 15 लाख रुपये, श्री. बंब यांचे घर ते ठोकळ सर यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे 15 लाख रुपये, प्रभाग क्र. 7 मध्ये होले घर ते मारूती मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, मुरकुटे सर निवास ते देविदास दहातोंडे निवास खडीकरण मुरमीकरण करणे 15 लाख रुपये या कामांचा समावेश आहे.
या कामांबरोबरच महायुती सरकारच्या काळात मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मोठा भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले.
Comments