मित्र पक्षांकडून यादी न आल्याने निर्णय । मात्र आरक्षण आंदोलन सुरुच राहणार
जालना । वीरभूमी- 04-Nov, 2024, 10:18 AM
रविवारी रात्री पत्रकार परिषद घेत 20 ते 25 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी सकाळी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. मात्र सकाळपर्यंत मित्र पक्ष असलेल्या मुस्लिम-दलित यांची उमेदवारी आली नाही. यामुळे एका जातीच्या समिकरणावर निवडणूक जिंकता येणार नसल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन सुरुच राहील असे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा इच्छुकांनी आपले अर्ज काढून घेण्याचे सांगितले. मात्र कोणत्याही पक्षाला आणि अपक्षाला पाठिंबा नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांनी जोरदार तयारी केली होती. यामुळे त्यांनी मराठा उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघात सात ते आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यासाठी मराठा-दलित-मुस्लिम असे समिकरण तयार करुन निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. यामुळे उमेदवारी कोणाला देण्यात येईल याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार रविवारी रात्री 10.30 वाजता पत्रकार परिषद घेत 17 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याबाबत घोषणा केली होती.
या घोषणेनंतर सोमवारी सकाळी उमेदवार यादी जाहीर करण्याचे सांगितले होते. मात्र मित्र पक्ष असलेल्या दलित-मुस्लिम समाजाकडून उमेदवारांची यादी न आल्याने मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघात घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी एका जातीच्या समिकरणावर निवडणूक जिंकने शक्य नसल्याचे सांगत निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आरक्षणासाठीचा लढा सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगत कोणाच्याही प्रचाराला जावू नका, कोणाचेही काम करु नका, गणिमी कावा करत ज्यांना पाडायचे त्यांना पाडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राजकारण हा आपला पिंड नसून एका जातीवर निवडणूक जिंकणे शक्य सल्याने सर्व डाव फसला असता, यामुळे माघार घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
Comments