मूकमोर्चा काढून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद । ग्रामस्थांची लक्षणिय उपस्थिती
पाथर्डी । वीरभूमी - 21-Nov, 2024, 02:22 PM
तालुक्यातील शिरसाटवाडी येथे आ. मोनिका राजळे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा कासार पिंपळगाव ग्रामस्थांनी चौकसभा घेवून जाहीर निषेध केला. यावेळी गावात व हद्दीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून मूकमोर्चा काढण्यात आला.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान सुरु असतांना भाजपाच्या उमेदवार आ. मोनिका राजळे या शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास गेल्या होत्या. मात्र तेथे गेल्यानंतर विरोधी उमेदवाराच्या घोषणा देत मोठा जमाव जमा होवनू आ. राजळेंच्या दिशेने दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत आ. राजळे यांच्या सोबत असलेले चार जण किरकोळ जखमी झाले. आ. राजळे यांच्या खांद्यालाही मार लागला. या घटनेची माहिती कळताच पाथर्डी तालुक्यासह शेवगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते पाथर्डीत जमा झाले होते. मात्र या घटनेनंतर आ. राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत परत माघारी जाण्याचे सांगितले. यामुळे तणावाची परिस्थिती निवळी.
दुसर्या दिवशी गुरुवारी राजळे यांचे गाव असलेल्या कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी सकाळी निषेध सभा घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हा हल्ला आ. राजळे यांच्यावरील नसून तो लोकशाहीवर असल्याचे सांगत एका महिलेवर भ्याड हल्ला करणार्यांचा निषेध केला. यावेळी कासार पिंपळगावासह वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.
निषेध सभेनंतर गावातून मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षिय ग्रामस्थ, तरुणांसह महिलांही सहभागी झाल्या होत्या.
We ARE rabid dogs That point Bahel and he was no one