डॉ. प्रशांत भालेराव आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
युरोपातील अझरबैजानच्या राजधानीत ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ पुरस्कार प्रदान
शेवगाव । वीरभूमी - 24-Dec, 2024, 11:44 AM
श्रीरेणुकामाता मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या आंतर्राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सपत्नीक सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा युरोपातील अझरबैजानच्या राजधानीत रंगला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक नवज्योत सिद्धू यांचेसह मान्यवरांच्या हस्ते डॉ. प्रशांतनाना भालेराव व त्यांच्या पत्नी जयंती भालेराव यांना सन्मानित करण्यात आले.
श्री रेणुकामाता मस्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी या संस्थेने गेल्या दोन दशकातील वाटचालीत देशातील नऊ राज्यात तब्बल 140 शाखाद्वारे दहा लाखावर ग्राहकांना पारदर्शक व विश्वसनीय सेवा देत आर्थिक क्षेत्रात लक्षणिय कामगिरी बजावली आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या आर्थिक क्षेत्रातील दिग्गज संस्थेचे ते अधिकृत ब्रोकर असून मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या चौथ्या माळ्यावर त्यांचे कार्यालय आहे. याशिवाय विमा नियंत्रक प्राधिकरण (ईरीडा) चे देखील ते प्रतिनिधी असून वीमा क्षेत्रातील विविध सेवा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. डॉ. भालेराव यांच्या व्यवसायाचे जाळे देशासह परदेशात विविध ठिकाणी पसरले आहे.
या संस्थांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे संसार उभे राहिले. तर अनेकांना त्यांच्या अर्थसहाय्याने आपल्या उद्योग व्यवसायाची भरभराट करता आली. भालेराव यांच्या संकल्पनेतून स्थापित रेणुका फाऊडेशनच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक भान जपले आहे. हुशार, गरजू व गरीब विद्यार्थांचे पालकत्व स्विकारून त्यांना गणवेश, शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक संस्थांना शाळा खोल्या, क्रीडा साहित्य, खेळणी, पुस्तके, बेंच, मतिमंद मुलांच्या शाळांना, वृद्धाश्रमांना चादरी, रग, मिष्टान्न, ग्रामपंचायतीना प्रोजेक्टर, स्मशानभूमी सुशोभिकरण, सीसी टीव्ही कॅमेरे, गोशाळा, मंदिर उभारणी, अशा कार्यात डॉ. भालेराव यांच्या संस्थांनी भरीव सहकार्य केले आहे. डॉ. प्रशांतनाना भालेराव यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या अगोदर देखील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
बँकिंग आणि फायनान्स या विषयात त्यांचा विशेष अभ्यास असल्याने अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सीटीने त्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणार्या देशपातळीवरील ‘राष्ट्रीय एकता’ पुरस्काराने, तसेच मुंबईच्या ‘कनेक्ट स्टार’ संस्थेच्या वतीने आर्थिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणार्या व्यक्तींना देण्यात येणारा ‘इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021’ अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. भालेराव यांच्या कार्यास आध्यात्मिक अधिष्ठान असून श्रीक्षेत्र अमरापूर येथील प्रख्यात, निसर्गरम्य व भव्य अशा श्रीरेणुकामाता देवस्थानची निर्मिती भालेराव नानांनीच आपल्या अपार श्रध्देतून केली आहे. अशा विविध क्षेत्रात नावाजलेले नाना यांचा देशासह जगभरात मोठा मित्रपरिवार आहे. त्यांना मिळालेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेक्शन’ या पुरस्काराबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
I saw him command center by board ammunition stocks are probably only the enemy s