शेवगाव । वीरभूमी- 22-Feb, 2025, 04:42 PM
जनशक्ती विकास आघाडीची नवीन कार्यकारणी आज संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे घोषित करून कॉ. राम पोटफोडे यांची जनशक्तीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आज शेवगाव येथे विधानसभा निवडणुकीनंतर जनशक्ती विकास आघाडीची दुसरी बैठक घेण्यात येऊन कार्याध्यक्षपदी राम पोटफोडे तर युवा अध्यक्षपदी वैभव पुरनाळे, उपाध्यक्ष म्हणून भाऊसाहेब बोडखे, लक्ष्मण गवळी, हरिश्चंद्र फाटे तर सचिव म्हणून शिवाजी लांडे, अमोल टेकाळे तर मागासवर्गीय सेल उपाध्यक्ष भारत भालेराव, देविदास रणदिवे, रामनाथ भालेराव यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून सचिन आधाट, मनोज घोंगडे, सखाराम घावटे, प्रभाकर मारकंडे, विश्वास ढाकणे, सूर्यभान घोरपडे, अस्लम शेख, रमेश चितळे, लक्ष्मण पाटेकर, अफसर बेग, आबासाहेब काकडे, राजेंद्र फलके, अनिल उबाळे, प्रमोद तांबे, तर उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोक ढाकणे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी माजी जि.प. सदस्य सौ. हर्षदा काकडे, महासचिव जगन्नाथ गावडे, अॅड. संजय काकडे, बंडूभाऊ कातकडे, भगवानराव डावरे, सुरेश म्हस्के, सुरेश चौधरी, अशोक आव्हाड, रामकिसन घनवट, बाळासाहेब पाटेकर, चंद्रकांत काकडे, शेषराव फलके, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, नवनाथ खेडकर, नामदेव ढाकणे, अशोकराव ढाकणे आदी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी अॅड. काकडे म्हणाले की, जनसामान्याचे गोरगरिबांचे लहान लहान प्रश्नासाठी आपण जनशक्ती संघटना स्थापन केली आहे. ही संघटना स्थापन केली व गोरगरिबांचे विविध लहान लहान प्रश्न सोडवत आहोत. तसेच ताजनापूर लिफ्ट योजनेतून 30 गावांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी लढत आहोत. हे संघटनेचे मोठे यश आहे. विधानसभा आपण लढलो, हरलो जरी असलो तरी आपण स्वाभिमान कुठेही गहाण ठेवला नाही. आपण आपल्या संघटनेच्या बळावरच लढलो. यश अपयश हा वेगळा विषय आहे. आताही नवीन पदाधिकार्यांना शुभेच्छा देताना मी सांगतो, तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करून गोरगरिबांच्या प्रश्नासाठी संघटनेने लढत राहायचे आहे. एक दिवस आपलाच असेल हे लक्षात घ्या. कुठेही आपण कमी नाहीत. मी म्हणजे संघटना मानू नका. आता संघटना स्वतंत्रपणे आपली कामे करणार आहे. त्यासाठीच आता ही कार्यकारणी व पदाधिकारी काम करणार आहेत.
नूतन कार्याध्यक्ष राम पोटफोडे म्हणाले की, आपण या संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी लढा देणार आहोत. तसेच तालुक्यात प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार आहोत. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका आपण संघटनेमार्फत स्वबळावर लढवणार आहोत. त्यामुळे आता संघटनेच्या सर्व सदस्यांनी संघटनेचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जायचे आहेत. गोरगरीब जनता निश्चित आज पश्चाताप करत आहे. आज शेतकर्यांचे शेतमालाला भाव नाही जनता हदबल झालेली आहे, असेही ते बोलताना म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्या सौ. काकडे म्हणाल्या, आज शेवगाव शहरातील अतिक्रमणाच्या मोहिमेतून शेवगाव शहर उध्वस्त झाले आहे. अगोदर या लोकांचे पुनर्वसन करून अतिक्रमण काढायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आज हजारो नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही काकडे यांनी यावेळी उपस्थित केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सातपुते यांनी तर हरी फाटे यांनी आभार मानले.
8n405y