पाथर्डी पोलिसांची धडाकेबाज कारवाई । एका महिलेची सुटका । लॉजिंग चालकाला अटक
पाथर्डी । वीरभूमी - 22-Feb, 2025, 04:38 PM
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अ. नगर रोड वरील विशाल लॉजिंगवर महिलांना आणुन त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन कुंटणखाना चालवून आपली उपजिवीका चालवणार्या नारायण भाऊसाहेब माने (रा. ढवळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पाथर्डी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. माने याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने माने याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व शेवगावचे विभागीय उपअधिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या सुचनेनुसार पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने व ज्योती शिंदे व पाथर्डी पोलिस ठाण्याचे पो.नि. संतोष मुटकुळे, सपोनि. हरीश भोये, सपोनि. शिवाजी तांबे, पोलीस अंमलदार नितीन दराडे, ईश्वर बेरड, ज्ञानेश्वर सानप, संदीप बडे, राजु सुद्रीक, अंजु सानप आदींच्या टीमने ही कारवाई केली.
पाथर्डी-अहिल्यानगर रस्त्यावर तिसगाव शिवारात विशाल लाँजिंग आहे. तेथे वेश्या व्यवसाय चालतो अशी माहीत स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डी पोलिस यांनी विशाल लाँजिंगवर छापा टाकला. तेथे एक तरुण महिला नारायण माने यांच्या सांगण्यावरून आली होती. तिला मु्क्कामी ठेवुन ग्राहकांकडुन पैसे घेवुन कुंटणखाना चालविला जात होता. अर्धे पैसे महिलेला व अर्धे पैसे माने याला मिळत होते. पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नारायण माने याला अटक करुन पाथर्डीच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीशांनी माने याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पिटा कायद्यानुसार या आठवड्यातला हा दुसरा गु्न्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील अनेक हॉटेलवर अवैध व्यवसाय रासरोसपणे सुरु आहे. त्यांच्याकडे पोलिसांची नजर कधी जाणार अशी विचारणा सर्व सामान्य नागरिकांकडुन होत आहे.
hnrpr5