अकोले तालुक्यातील घटना । आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अकोले । वीरभूमी- 22-Feb, 2025, 04:56 PM
दारूच्या नशेत भावजयी बरोबर रात्रीच्या सुमारास किरकोळ भांडणाच्या कारणावरुन अनकुचीदार व टनक हत्याराने डोक्यावर, तोंडावर व अंगावर मारहाण करून खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील उंचखडक बु. येथे घडली असुन अकोले पोलिसांनी तात्काळ आरोपी राजु शंकर कातोरे यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अकोले पोलिसांत मयत जिजाबाई शिवराम खोडके याचा मुलगा सुनिल शिवराम खोडके(वय24, ह. रा. उंचखडक बु., ता. अकोले) याने फिर्याद दिली असुन यानुसार फिर्यादी व त्याची आई जिजाबाई शिवराम खोडके व चुलते राजु शंकर कातोरे हे बोरीचीवाडी, गर्दणी येथील मुळ राहणार असुन सध्या ते भाऊसाहेब आनंदा देशमुख (रा. उंचखडक बु.) यांची शेती वाट्याने करत असुन त्यांचेच शेडमध्ये उंचखडक बु. येथे एकत्र राहत आहेत.
चुलता राजु शंकर कातोरे याची पत्नी पळून गेलेली असुन त्याला दारूचे व्यसन आहे. तो आईकडे नेहमी दारूला पैसे मागतो. नाही दिले तर आईला मारहाणही करत असे. काल दि. 20/02/2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास राहत असलेल्या शेडमध्ये फिर्यादीची आई जिजाबाई शिवराम खोडके असताना फिर्यादीचा चुलता आरोपी राजु शंकर कातोरे याने दारूच्या नशेत किरकोळ भांडणाच्या कारणावरून अनकुचीदार व टनक हत्याराने आईच्या डोक्यावर, तोंडावर, अंगावर मारहाण करून खून केला असल्याची फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गुरनं. 62/2025 भरतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी जावुन पाहणी करुन पथक तयार केले व पळून जाण्याचे तयारीत असलेला आरोपी राजू शंकर कातोरे यास पोनि. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील पो. हे. कॅा.हुसेन शेख, पो. कॉ. अविनाश गोडगे, पो.ना. मोरे व पोलिस मित्र आकाश पांडे यांचे पथकाने अकोले शहरातून ताब्यात घेतले आहे.
तर पोनि. बोरसे यांनी वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना घटनेची माहिती कळवुन गुन्हा दाखल करत मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.
sskog9