जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या झाली २६१
अहमदनगर । वीरभूमी - 16-Jun, 2020, 12:00 AM
शेवगाव तालक्यातील भावीनिमगाव येथे
कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून आलेला 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. 14 जून रोजी ही व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी केलेल्या तपासणीत ती व्यक्ती बाधित आढळून आली.
तसेच बोल्हेगाव फाटा, अहमदनगर येथे कुर्ला नेहरूनगर येथून
आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता. तर राहाता शहरातील एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
BLHESnaleqZTDjIG