अकोले तालुक्यात जोरदार पाऊस
अकोले । वीरभूमी - 16-Jun, 2020, 12:00 AM
अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीला पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे आज दिनांक 16 जून रोजी सायंकाळी मुळा नदीवरील कोतुळ येथील पूल पाण्याखाली गेला.
गत वर्षी जुलै महिन्यात पाण्याखाली गेलेला हा पूल या वर्षी एक महिना अगोदरच पाण्याखाली गेला आहे. आता हा पूल दिनांक 21 जानेवारी 2021पर्यंत पाण्याखाली राहील असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नवीन पुलाची वाट पाहणाऱ्या परिसरातील गावच्या लोकांच्या पदरी पुन्हा एकदा फरफटच वाट्याला आली आहे.
पिंपळगाव खांड , पांगरी ही गावे व या भागातील छोट्या छोट्या वाड्या कोतुळ येथील मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी आता दुसऱ्या लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे तसेच या नदीवरून जाण्यासाठी खाजगी होड्याही सुरू होतील मात्र विनापरवाना असलेल्या मध्ये प्रवास करताना जीव धोक्यात घालून परिसरातील नागरिकांना आता नाईलाजास्तव या होड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.
azKOEHjQxCfL