तहसीलदार नामदेव पाटील यांचा इशारा
पाथर्डी । वीरभूमी - 17-Jul, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावात विना परवानगी येणार्या नागरिकांवर व त्या व्यक्तीस सहारा देणार्या अशा दोघांवरही प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाथर्डीचे तहसीलदार तथा इंसिडेंट कमांडर नामदेव पाटील यांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदार नागदेव पाटील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरी कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपययोजना एक भाग म्हणुन पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावात विना परवानगी येणार्या नागरिकांना प्रतिबंध केला आहे.
तसेच तालुक्यातील कोणत्याही गावात एखादी व्यक्ती विनापरवानगी आल्यास व सदर व्यक्तींस आसरा देणार्या व्यक्ती अशा दोघांवरही प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188, 269, 270 नुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिला आहे.
kFsEtPeWr