शहरात 05 तर मुंगी येथे 05 जणांचा समावेश
शेवगाव । वीरभूमी - 18-Jul, 2020, 10:21 AM
आज शनिवारी सकाळी शेवगाव शहरातील 05 तर तालुक्यातील मुंगी येथील 05 अशा 10 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
शेवगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. शहरातील मारवाडगल्ली व गांधी पुतळ्याजवळ कोरोना बाधित आढळल्यानंतर आज पुन्हा शहरात 05 कोरोना बाधित आढळले आहे. तसेच मुंगी येथे आढळलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 05 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Fakt awahan n karta kadak action ghyayla havi sarkari karyalayat suddha koni mask cha use karat nahi