उपकारागृहा पाठोपाठ श्रीगोंदा पोलिसांच्या कोरोना चाचणीत एक कर्मचारी बाधीत
श्रीगोंदा । वीरभूमी - 04-Oct, 2020, 12:00 AM
श्रीगोंदा उपकारागृहातील कैद्यांना लक्षणे दिसल्याने शनिवारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ सर्व ५५ कैद्यांची आरोग्य विभागाला पाचारण करून कोरोना चाचणी घेतली त्यात ३६ जण पॉझिटिव्ह निघाल्याने पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी निरीक्षक जाधव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितिन खामकर व ग्रामीण रुग्णालयाचे पथक बोलावून रविवार दि.४ रोजी पोलिस ठाण्यात हजर असलेल्या ३१ पोलीस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी घेतली त्यात फक्त १ कर्मचारी पॉझिटिव्ह आला. ३० कर्मचारी निगेटिव्ह आल्याने पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांची काळजी कमी झाली.
तालुक्यात रविवारी १४४ रॅपिड अँटीजन चाचण्यात ११ जण पॉझिटिव्ह आले.तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात २ जण संक्रमित आढळले. एकूण बधितांची संख्या १७७६ झाली आहे. रविवारी २० जण बरे होऊन घरी परतले त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या १६२० झाली आहे. आत्तापर्यंत ३३ जणांचा बळी गेला आहे.
सद्यस्थितीला ६२ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर ५५ जण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अजून नगर येथून ५० जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
रविवार दि.४ रोजी श्रीगोंदा शहरात पोलीस ठाणे व बसस्थानक परिसरात प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात लोणी व्यंकनाथ-५, जंगलेवाडी-२, घोडेगाव-१,काष्टी-१,येळपणे-१,पारगाव-१ असे रुग्ण संक्रमित आढळले. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
xkcmPEAbUpjMlh