बाधितांमध्ये शिरुर व नगर तालुक्यातील 5 जणांचा समावेश
पाथर्डी । वीरभूमी - 04-Oct, 2020, 12:00 AM
रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यात 22 तर शिरुर तालुक्यातील एक व नगर तालुक्यातील 4 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज पाथर्डी तालुक्यातील 34 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी शहरातील रंगार गल्ली 1, कासार गल्ली 1, कसबा पेठ 1, वामनभाऊ नगर 2, विजयनगर 1, नाथनगर 2 असे कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील तनपुरवाडी 1, डमाळवाडी 1, जोगेवाडी 1, पागोरी पिंपळगाव 1, तिसगाव 1, कोरडगाव 3, मुखेकरवाडी 1, कौडगाव 1, जिरेवाडी 1, शिरसाटवाडी 1, खरवंडी कासार 1, करंजी 1 असे 14 बाधित आढळले.
तसेच पाथर्डी येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन कोरोना चाचणीत शिरुर तालुक्यातील निमगाव येथील 1 व नगर तालुक्यातील देहरे येथील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
uXhcOUNDvm