पाथर्डी । वीरभूमी - 05-Oct, 2020, 09:42 PM
सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यात 52 तर शिरुर तालुक्यातील, अहमदनगर व शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी एक असे 55 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज पाथर्डी तालुक्यातील 33 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी शहरातील पाथर्डी शहर 2, आसरा नगर 1, कसबा पेठ 2, बँक कॉलनी 1, भगवाननगर 2, फुलेनगर 1, इंदिरानगर 3, वामनभाऊ नगर 6, रंगारगल्ली 2, खंडोबानगर 1 असे कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील अकोला 3, खरवंडी कासार 3, चिंचपूर इजदे 2, डमाळवाडी 2, भुतेटाकळी 2, भालगाव 1, खेर्डे 1, मिरी 1, शिरापूर 2, मढी 1, पागोरी पिंपळगाव 1, धामनगाव देवी 1, तिसगाव 2, कौडगाव 1, चितळी 1, करंजी 1, तिनखडी 1, येळी 3, केळवंडी 1, जिरेवाडी 1, दुले चांदगाव 1, चिंचपूर पांगूळ 2, शिरसाटवाडी 2 असे बाधित आढळले.
तसेच पाथर्डी येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन कोरोना चाचणीत शिरुर तालुक्यातील टेंभूर्णी येथील 1 व अहमदनगर येथील 1 तर शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील 1 असे एकूण 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
UnWpLCvZbkYljrf